गो कोरोना गो स्पर्धेचा निकाल जाहीर, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 03:39 PM2020-10-07T15:39:48+5:302020-10-07T15:41:59+5:30
Coronavirus,Competition, Results, Student, satara लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना बराच मोकळा वेळ मिळाला. या वेळेचा सदुपयोग होण्याबरोबरच विद्यार्थी-पालक सहभागातून घेण्यात आलेल्या स्पर्धांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात छोट्या गटातून साई पवार आणि वेदांती जाधव तर मोठ्या गटातून ज्ञानेश्वरी बाबर आणि आर्या रसाळ प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले.
सातारा : लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना बराच मोकळा वेळ मिळाला. या वेळेचा सदुपयोग होण्याबरोबरच विद्यार्थी-पालक सहभागातून घेण्यात आलेल्या स्पर्धांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात छोट्या गटातून साई पवार आणि वेदांती जाधव तर मोठ्या गटातून ज्ञानेश्वरी बाबर आणि आर्या रसाळ प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले.
लॉकडाऊनच्या काळात सजग पालक सामाजिक संस्था आणि जायन्टस ग्रुप आॅफ साताराच्या माध्यमातून केलेले ह्यगो कोरोना गोह्ण या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात नातेवाइकांमध्ये कोरोनाबाबत फोन आणि पत्राद्वारे जागृती करणे, सूर्यनमस्कार करणे, छंद जोपासणे, आदर्श व्यक्तिबद्दल ३ मिनिटे बोलणे, वाचलेल्या पुस्तकाचा सारांश सांगणे यासह या सुटीने मला काय दिले, याविषयावर निबंध लिहिणे आदी विषयांवर स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत सातारा, पुणे, मुंबई, ठाणे बारामती, सांगली, कोल्हापूर येथील मुलांनी सहभाग घेतला. याचा पारितोषिक वितरण समारंभ जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि समीर शेख यांच्या हस्ते झाला. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे पर्व पहिले, लहान गट : साई पवार, रिया भद्रेश शाह, अक्षरा कोळेकर. मोठा गट ज्ञानेश्वरी बाबर, नरीन भट्टड, ईशिता जगताप. पर्व दुसरे, लहान गट : वेंदाती जाधव, श्रीनिवास आयाचित, विराट क्षीरसागर, मोठा गट : आर्या रसाळ, राजवर्धन दगड, वेदांत थोरवे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले.
श्रीनिवास आयाचित सामाजिक बांधिलकी
सातारा येथील सजग पालक आणि जायंटस ग्रुप आॅफ साताराच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत मोठ्या गटात विजेता ठरलेल्या श्रीनिवास आयाचित याने बक्षिसातून मिळालेली रक्कम जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सुपूर्द केली. कोविडशी लढा देताना प्रशासनाला मदत करण्यासाठी स्वत: मिळविलेल्या पैशांतून सेवा करण्याचं ठरवून त्याने ही रक्कम दिली. त्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडूनही कौतुक करण्यात आले.