सातारा : शरद पवारांसमक्ष भर व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे यांना कडकडून मिठी मारताच जिल्हा परिषदेच्या मैदानावर शिट्ट्यांचा आवाज घुमला. खासदार उदयनराजे भोसले यांना भाषण करताना रडू कोसळले. भावनेच्या भरात त्यांनी खासदार शरद पवार यांचे नाव घेतले.
दरम्यान, अजिंक्यतारा किल्ल्यासाठी २५ कोटी, हद्दवाढ व मेडिकल कॉलेजसंदर्भात उदयनराजे यांनी चिठ्ठी दिली असून आपण हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.सोहळ्यासाठी जनसमुदायाला उद्देशून बोलताना ‘जोपर्यंत माझ्यात ताकद आणि श्वास आहे, तोपर्यंत जगणार तुमच्या सगळ्यांसाठी,’ अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली भावना व्यक्त केली.
दरम्यान, सुरुवातीला उदयनराजे भाषणाला उभारले तेव्हा श्रोत्यांमधून टाळ्या अन् शिट्ट्या एवढ्या वाजल्या की त्यांना लवकर भाषण सुरू करता आले नाही. ‘बस... बस’ असे उदयनराजेंनी म्हटले तरी कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होत नव्हता.‘कॉलेजमध्ये असतानाही वक्त्याचे भाषण सुरू होण्यापूर्वी आम्ही टाळ्या वाजवायचो. त्यांना वाटायचं शॉर्ट अन् स्वीटमध्ये भाषण उरकावं. असंच आज वाटतेय. मला कधीतरी समजून घ्या. मी सुद्धा तुमच्यासारखाच माणूस आहे. कोणत्याही घराण्यात जन्माला आलो असलो तरी अनावधनाने काही चूक होत असेल तर मित्रत्वाच्या नात्याने मला सांगत चला. तुमच्या भावनांचा, प्रेमाचा कधीही माझ्याकडून अवमान होणार नाही,’ असे सांगून श्रोत्यांसाठी उदयनराजे भोसले यांनी ‘तुम्हीच लोकशाहीतले खरे राजे’ असा उल्लेख केला.
‘गांधी मैदानावरील एका सभेत मी सांगितलं ३६५ दिवस २४ तास कधीही मला हाक मारा. मी तुमच्या सेवेशी हजर आहे. त्यानंतर एकदा रात्री पावणेदोनला मला काही युवकांचा फोन आला. मी म्हणालो, काय झालंय. तर त्या युवकांनी सांगितलं की, असंच पिक्चरला आलो होतो. तुम्ही म्हणाला कधीही फोन करा म्हणून रात्री तुम्हाला कॉल केला,’ असं उदयनराजेंनी सांगताच पुन्हा जोरदार हशा पिकला. अनेकांकडून इथं खूप स्तुती झाली. मी भारावून गेलो. मी आसपास कुठे हरभराचे झाड पाहत होतो, असं मिश्किलपणे सांगत उदयनराजे म्हणाले की, विकासकामे मार्गी लावल्या जातील. कुठंही कमी पडणार नाही. मी फार बोलणार नाही. इतरांसारखं माझ्यामुळे सगळं जग आहे, असं मी म्हणणार नाही. तुम्हा सर्वांमुळे मी येथे आहे,’ असंही उदयनराजे म्हणाले.कार्यकर्ता म्हणाला.. वुई लव यूउदयनराजे मनोगत व्यक्त करत होते, तेव्हा पे्रक्षकांतून एक उत्साही कार्यकर्ता ‘वुई लव यू राजे,’ असं मोठ्यानं म्हणाला, तोच धागा पकडून ‘अं.. बरं झालं, हे तुम्ही बोललात. त्या जागी कुठली मुलगी बोलली असती तर आम्हाला डायरेक्ट सोडचिठ्ठीच मिळाली असती,’ असं उदयनराजे मिश्किलीत म्हणाल्याने एकच हशा पिकला.भाजपची संपूर्ण टीम स्टेजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित पार पडलेल्या या सोहळ्यात भाजपचे गटनेते धनंजय जांभळे, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे यांच्यासह नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य अशी सर्वच टीम स्टेजवर पाहायला मिळत होती....तुम्ही कºहाडचेही खासदार : चव्हाणउदयनराजे तुम्ही कºहाडचेही खासदार आहात, त्यामुळे विकासकामांचा विचार करताना कºहाडचाही विचार करा, अशी मिश्किली आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात करताच हशा पिकला.रिमोटचे बटन दाबून कामांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी रिमोटचे बटन दाबून कामांचे उद्घाटन केले. कास धरण उंची वाढविण्याच्या महत्त्वकांक्षी प्रकल्प व भुयारी गटार योजनांचे उद्घाटन जाहीरपणे करण्यात आले.कल्पनाराजे प्रेक्षकांतउदयनराजेंच्या सत्कारावेळी त्यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले प्रेक्षकांमध्ये बसल्या होत्या. कल्पनाराजे यांना रयतेत बसल्याचे पाहून मला याचा आनंद वाटत आहे, असे शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले.