सातारा : नैसर्गिक वाळूचा तुटवडा भासत असल्याने क्रश सँडचा पर्याय पुढे आला आहे. त्यामुळे यापुढे शासनाच्या नवीन प्रकल्पांचा डोलारा हा कृत्रिम वाळूच तारू शकणार आहे. त्यातच चाचणी आणि अटींचे पालन केल्यास ही वाळू बांधकामासाठी मजबूत ठरू शकते, अशी मते पुढे आली आहेत.
साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरसाठी नैसर्गिक वाळू कमी पडली. त्यामुळे काँक्रि टीकरणाचे काम काही दिवस थांबले होते. परिणामी सेपरेटरच्या कामासाठी पुण्याच्या बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयाकडे क्रश सँडचा वापर करण्यास परवानगी मागितली होती. संबंधित अधिकाºयाने ग्रेड सेपरेटरसाठी क्रश सँड १०० टक्के वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सेपरेटरचे काम आता वेगाने सुरू होणार आहे. तसेच हे काम वेळेत पूर्ण करता येणे शक्य आहे.
क्रश सँडचा वापर पुढे आल्याने ही वाळू बांधकामांना टिकणार का ?, बांधकामाला मजबुती येणार का? या वाळूमुळे कामाचा टिकाऊपणा किती वर्षे राहणार ? असे प्रश्न समोर येत आहेत. त्यावर संबंधित अधिकाºयांसह इतर अभियंत्यांनीही क्रश सँडशिवाय येथून पुढे पर्याय नसल्याचे सांगितले.नैसर्गिक वाळू कमी पडते व उपलब्धता होत नसल्याने शासनानेच परिपत्रक काढून क्रश सँडचा पर्याय सर्वांनाच दिला आहे. त्यातच क्रश सँडमध्ये नवनवीन शोध लागत आहेत. त्यामधील व्हीएसआय सँड हा चांगला पर्याय असल्याचे अधिकारी सांगतात. शासनाने काढलेल्या परिपत्रकात सुमारे दहा अटी आहेत. या अटींच्या अधीन राहून काम केल्यास व क्रश सँडची प्रयोगशाळेत चाचणी करून योग्यता मिळाल्यास ही वाळू कोणत्याही बांधकामांना वापरता येणार आहे. त्यामुळेच साताºयातील ग्रेड सेपरेटरसाठी तपासणी करून कृत्रिम वाळू वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार क्रश सँड बांधकामांसाठी वापरता येते. नैसर्गिक वाळू मिळत नसल्यानेच हा पर्याय पुढे आला आहे. क्रश सँड तांत्रिक पद्धत व चाचणी करून वापरल्यास बांधकाम मजबूत होते. साताºयातील ग्रेड सेपरेटरचे काम हे महत्त्वाचे आहे. ते मजबूत व चांगले व्हावे, हीच अपेक्षा आहे.- चिन्मय कुलकर्णी, अध्यक्ष संकल्प इंजिनिअरिंग सेवाभावी संस्थानैसर्गिक वाळू मिळत नसल्याने येथून पुढच्या शासनाच्या नवीन प्रकल्पांना क्रश सँडच वापरावी लागणार आहे. परिपत्रकातील अटींचे पालन व चाचणी करून कृत्रिम वाळू वापरल्यास बांधकाम मजबूत होते. सध्या क्रश सँडवर अनेक कामे सुरू आहेत.- आर. टी. अहिरे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम