किराणा मालाची दुकाने अजून आठ दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:30 AM2021-06-01T04:30:05+5:302021-06-01T04:30:05+5:30

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये दि. ८ जूनपर्यंत संचारबंदी आदेशांना वाढ देत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी अजूनही बहुतांश बाबींना निर्बंध घातलेले आहेत. ...

Grocery stores closed for another eight days | किराणा मालाची दुकाने अजून आठ दिवस बंद

किराणा मालाची दुकाने अजून आठ दिवस बंद

googlenewsNext

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये दि. ८ जूनपर्यंत संचारबंदी आदेशांना वाढ देत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी अजूनही बहुतांश बाबींना निर्बंध घातलेले आहेत. किराणा मालाची दुकानेही अजून आठ दिवस बंद राहतील तसेच भाजीपाला, दूध, वृत्तपत्र वितरण सुरू ठेवण्यास परवानगी आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशांमध्ये काही गोष्टींना शिथिलता मिळेल, असे सर्वसामान्यांना वाटत होते. लॉकडाऊन कितीही काळ सुरू राहिले तरी गोरगरीब जनता आदेशाचे पालन करून घरात बसून राहते; परंतु त्यांना जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळाल्या तर त्यांची कोंडी होणार नाही. पिठाच्या गिरण्या, किराणा मालाची दुकाने, दूध, भाजी विक्री मर्यादित वेळेत सुरू ठेवली, तर लोकांची उपासमार टळेल. जिल्हाधिकाऱ्यांनी दूध आणि घरपोच भाजी विक्री करण्यास परवानगी दिली असली तरीसुद्धा घरातील गहू, ज्वारी हे धान्य गिरणीत नेऊन त्याचे पीठ केल्याशिवाय भाकरी, चपाती बनत नाही, तसेच मर्यादित उत्पन्न असलेला गट रोजच्या रोज किरकोळ किराणा साहित्य खरेदी करून कुटुंबाची गुजराण करत असतो, त्यांचा विचार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात केलेला दिसत नाही.

दरम्यान, जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची खरीप हंगामाची कामे सुरू असल्याने शेतीला लागणारे साहित्य बी-बियाणे यांची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व बँकांचे अंतर्गत कामकाज सुरू राहील तसेच बँकिंग सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. मात्र, शेतकऱ्यांना वित्तीय पुरवठा करण्यासाठी बँकांना परवानगी देण्यात आली आहे.

हे सुरू राहील

- रुग्णालय, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण केंद्रे

- वैद्यकीय विमा कार्यालय, औषध दुकाने, औषध कंपन्या

- व्हेटर्नरी हॉस्पिटल, ॲनिमल केअर सेंटर

- दूध संकलन केंद्र सकाळी सात ते नऊ व सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत घरपोच दूध वितरणाला परवानगी

- शेतीविषयक सेवा, बी-बियाणे, खते शेतीविषयक उपकरणे, त्यांची दुरुस्ती, देखभाल पुरवणारी सेवा दुकाने सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत तर घरपोच सेवा सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत

- शिवभोजन थाळी योजना फक्त पार्सल सुविधा

- शीतगृहे व गोदाम सेवा

- मान्सूनपूर्व उपक्रम व सर्व लोकांची इमारतीबाबतची मान्सूनपूर्व कामे

- भारतीय सुरक्षा मंडळाची कार्यालये, सेबी मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरी कार्पोरेशन कार्यालय

- टेलिकॉम सेवेतील दुरुस्ती व देखभाल पुरवणारी सेवा

अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविण्यासाठी व्यापार व प्रसारमाध्यमे

- पेट्रोल पंप सेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी

- पाणीपुरवठा, मालवाहतूक, खासगी व शासकीय सुरक्षा सेवा

- विद्युत व गॅसपुरवठा, एटीएम सेवा, टपालसेवा

- रास्त भाव दुकाने सकाळी ७ ते ११, औषध दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७

- कृषी उत्पन्न बाजार समिती या फळे, भाजीपाला घाऊक खरेदी-विक्रीसाठी सकाळी ६ ते ११ यावेळेत. (याठिकाणी किरकोळ विक्री करता येणार नाही)

- फळे व भाजीपाला सकाळी सात ते दुपारी तीन या कालावधीत घरपोच

- निर्यात मालाचे उत्पादन करणारे कारखाने

खालील बाबी पूर्णत: बंद

- व्यापारी दुकाने व इतर सर्व दुकाने आस्थापना

- उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, वॉल बाजार मार्केट

- भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडा व दैनंदिन बाजार मंडई, फेरीवाले

- वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारू दुकाने

- सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते व इतर व्यवसाय करणारी व्यापारी दुकाने

- सर्व बेकरी पदार्थ विक्री पूर्णत: बंद

- वाहन दुरुस्ती गॅरेज, स्पेअरपार्टची दुकाने

- रिझर्व बँक ऑफ इंडियाद्वारे सर्व सेवा

- सहकारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, खासगी बँका व सहकारी बँका

- सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळ पूर्णपणे बंद राहतील

- सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था, बांधकामे

शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अनुषंगाने पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी सहकारी बँका सुरुवातीला एटीएममध्ये पैसे भरण्याचे क्लिअरन्स ही कामे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा ते दुपारी दोन या कालावधीत चालू राहतील. बँकांचे इतर कामकाज पूर्णतः बंद राहील.

कोट

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढताना सर्वसामान्य जनतेचा विचार करायला हवा होता. महिन्याचे एकदम किराणा साहित्य घेणार्‍या लोकांना चिंता नाही; परंतु जे लोक गल्लीतल्या दुकानात जाऊन पावशेर, अर्धा पावशेर वस्तू खरेदी करतात, त्यांनी काय उपाशी राहायचे का?

- चंद्रकांत खंडाईत, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

Web Title: Grocery stores closed for another eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.