येराडला गटविकास अधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:40 AM2021-04-24T04:40:08+5:302021-04-24T04:40:08+5:30
कोयनानगर : येराड (खंडुचावाडा) येथे गुरूवारी एका दिवसात ४४ कोरोना बाधित रुग्ण सापडले होते. त्यानंतर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर ...
कोयनानगर
: येराड (खंडुचावाडा) येथे गुरूवारी एका दिवसात ४४ कोरोना बाधित रुग्ण सापडले होते. त्यानंतर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी शुक्रवारी गावात प्रत्यक्ष पाहणी केली.
येराडमध्ये तीन दिवसांत पन्नास रूग्ण बाधित निघाल्याने कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरले आहे. अजूनही बाधितांच्या संपर्कातील लोकांची चाचणी होणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून येराड ग्रामपंचायतीने सर्व गावात औषध फवारणी केली आहे.
दुपारी तीन वाजता गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी बाधित खंडुचावाडा येथे भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. तसेच सर्व बाधितांना औषधे व सेवा सुविधा पुरवठा करण्यात यावा. बाधितांची ऑक्सिजन पातळी तपासणी करून अधिक उपचाराची गरज असेल त्यांना पाटण कोरोना सेंटरमध्ये हलविण्यात यावे, काही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधावा. ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले, त्यांना चार दिवसांनी पुन्हा चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी सरपंच प्रकाश साळुंखे, विस्ताराधिकारी संदीप कुंभार, आर. के. गायकवाड, आरोग्य सहाय्यक जी. ए. धुमाळ, पोलीसपाटील रवींद्र साळुंखे, तलाठी पी. जी. शिंदे, ग्रामसेवक तानाजी ढाणे, प्रकाश साळुंखे उपस्थित होते.
कोट :
जिल्ह्यातील बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने येराडला भेट शक्य नाही. तसेच आरोग्य यंत्रणेवर ताण आहे तरी लोकांनी घराबाहेर न पडता आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.