पिकांचे नुकसान; परतीच्या पावसाचा कहर, साताऱ्यात संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 02:44 PM2020-10-15T14:44:26+5:302020-10-15T14:48:19+5:30

satara, rain, Mahabaleshwar Hill Station सातारा जिल्ह्यात शनिवारपासून परतीचा पाऊस सुरू असून पाचव्या दिवशी तर कहर झाला. सातारा शहरात सकाळपासून संततधार होती. तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही रिमझिम तसेच मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले. तर या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच २४ तासांत पाटण तालुक्यात १६१ मिलिमीटर पाऊस झाला.

The havoc of return rains, continuous in Satara | पिकांचे नुकसान; परतीच्या पावसाचा कहर, साताऱ्यात संततधार

पिकांचे नुकसान; परतीच्या पावसाचा कहर, साताऱ्यात संततधार

Next
ठळक मुद्दे पिकांचे नुकसान; परतीच्या पावसाचा कहर, साताऱ्यात संततधार पाटणला १६१ मिलिमीटर पाऊस, नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल

सातारा : जिल्ह्यात शनिवारपासून परतीचा पाऊस सुरू असून पाचव्या दिवशी तर कहर झाला. सातारा शहरात सकाळपासून संततधार होती. तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही रिमझिम तसेच मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही
मुश्किल झाले. तर या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच २४ तासांत पाटण तालुक्यात १६१ मिलिमीटर पाऊस झाला.

जिल्ह्यात आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला. सप्टेंबरमधील पावसाने तर सर्व मोठी धरणे भरली. तर सध्या परतीच्या पावसाचा जिल्ह्यात धुमाकूळ सुरू आहे. शनिवारपासून हा पाऊस पडत आहे. पहिल्या दिवशी कऱ्हाड , कोरेगाव, माण, फलटण, वाई, खंडाळा अशा सर्वच तालुक्यात दमदार पाऊस झाला. तर रविवारी काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. सोमवारी जिल्ह्यात पाऊस पडला. पण, म्हणावा असा जोर नव्हता. मात्र, मंगळवारपासून परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. साताºयासह दुष्काळी भागातही पाऊस कोसळू लागलाय. पश्चिम भागातील कोयनानगर, नवजा, कास, बामणोली आणि महाबळेश्वर परिसरातही पाऊस पडत आहे.

जिल्ह्यात बुधवारी पहाटेपासून पाऊस पडत आहे. या पावसाचा जोर वाढू लागलाय. सातारा शहरात तर सकाळपासूनच संततधार सुरू होती. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झालेले. तर ग्रामीण भागातही रिमझिम तसेच मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत होता. काही ठिकाणी तर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतीच्या कामांना फटका बसला आहे. तसेच खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन, मका, भुईमूग पिकांना चांगलाच फटका बसलाय. यामुळे उत्पादनात घट होणार आहे. सततच्या या पावसामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात ५१० मिलिमीटर पाऊस; सातारा, पाटणला अधिक नोंद...

जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरूच असून बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ऐकूण ५१०.१० मिलिमीटर पाऊस पडला. तर सरासरी ५.६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सकाळी ८ पर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय एकूण पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये अशी आहे. सातारा - १०५.६०, जावळी -२९.२०, पाटण - १६१, कऱ्हाड - ९५, कोरेगाव - ३३, खटाव - ३०.७०, माण - ६, फलटण - १२, खंडाळा - ९.४०, वाई - ६ आणि महाबळेश्वर - २२.६० मिलिमीटर.

कोयनेचे दरवाजे बंद; पायथा वीजगृहातूनच विसर्ग...

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा अधिक जोर राहिला आहे. तसेच कोयना, नवजा येथे चांगला पाऊस झाला. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयाननगर येथे २३ तर यावर्षी आतापर्यंत ४३८२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे १० आणि यावर्षी जूनपासून ५०९० तसेच महाबळेश्वर येथे सकाळपर्यंत ३ आणि यावर्षी ५०४६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात १०४.२८ टीएमसी पाणीसाठा होता. धरणाच्या दरवाजातून विसर्ग बंद करण्यात आलेला. तर पायथा वीजगृहातूनच २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. हे पाणी कोयना नदीत जात आहे.

 

Web Title: The havoc of return rains, continuous in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.