हेळगावला कोरोना योद्धयांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:36 AM2021-02-14T04:36:41+5:302021-02-14T04:36:41+5:30
सरपंच शारदा जाधव, उपसरपंच संजय सूर्यवंशी, माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव संकपाळ, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे, माजी अध्यक्ष श्रीमंत ...
सरपंच शारदा जाधव, उपसरपंच संजय सूर्यवंशी, माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव संकपाळ, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे, माजी अध्यक्ष श्रीमंत सूर्यवंशी, आदींसह मान्यवर उपस्थित होते.
गत नऊ ते दहा महिने कोरोनाचे संकट आहे. परिसरात अनेक रुग्ण सापडत असताना हेळगावमध्ये मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच बाधित सापडले. या संकटातही गावाला जास्त त्रास झाला नाही. शासनाचे प्रशस्त आणि सर्व सोयींनीयुक्त प्राथमिक आरोग्य केंद्र गावात आहे. याबरोबर तीन खासगी दवाखाने गावात असून, यातील डॉक्टर दररोज सेवा देत होते. सुरुवातीला गावच्या प्रवेशद्वाराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या होत्या. पोलीस प्रशासनाच्यावतीने तरुण मुलांची ‘पोलीस मित्र’ म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी आपले कर्तव्य बजावले. याव्यतिरिक्त गावातील युवकांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावात तीनवेळा जंतूनाशक फवारणी केली. बाहेरचा भाजीपाला विक्री गावात करू दिली नाही. मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप व वापर करण्यात येत होता. यासारख्या अनेक कारणाने गावाने कोरोनासारख्या संकटावर यशस्वी मात केली. याबरोबरच कोरोना योद्धयांचा वाटाही तितकाच महत्त्वाचा असल्याने ग्रामपंचायतीच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी, खासगी डॉक्टर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस मित्र यांचा गौरव करण्यात आला. माजी सरपंच बाळासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
फोटो : १३केआरडी०४
कॅप्शन : हेळगाव (ता. कºहाड) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचा ग्रामपंचायतींच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच शारदा जाधव, उपसरपंच संजय सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.