जखीणवाडीत गावासाठी योगदान देणाऱ्या परिचारिकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:36 AM2021-05-15T04:36:24+5:302021-05-15T04:36:24+5:30
योग्य कामाची दखल घेऊन पाठीवर शाबासकीची थाप लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाशी निगडित असणाऱ्या सगेसोयऱ्यांनी ...
योग्य कामाची दखल घेऊन पाठीवर शाबासकीची थाप
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाशी निगडित असणाऱ्या सगेसोयऱ्यांनी कोरोना महामारीत अनेक ठिकाणी पाठ दाखविली. अशा या कठीण प्रसंगांत आपला जीव धोक्यात घालून प्रत्येक कुटुंबातील रुग्णांची अखंडपणे सेवा केली. अशा परिचारिकांना त्याच्या कामाची दखल घेत नवी ऊर्जा देण्यासाठी जखीणवाडीतील ग्रामस्थांनी त्यांचा गुणगौरव केला.
आदर्श सरपंच नरेंद्र पाटील, महिला सरपंच शोभा नलवडे, उपसरपंच शंकर झिमरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी थेट नांदलापूर उपकेंद्रात जाऊन मास्क, सॅनिटायझरसह मेडिकल साहित्या देऊन डॉ. आवळेकर, देवकांत व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.
यावेळी आदर्श सरपंच नरेंद्र पाटील म्हणाले. जागतिक परिचारिका दिन हे निमित्त असते. स्वतःच्या आरोग्याची तमा न बाळगता या माताभगिनी समाजातील प्रत्येक कुटुंबातील आजारी माणसांची सेवा करतात. त्यांच्या कामाची किंमतच करता येत नाही. केवळ पाठीवर शाबासकीची थाप टाकल्यास काम करण्यास हुरूप येतो. ही दिलेली भेट त्यांना भविष्यात कामासाठी ऊर्जा देणारी असेल.
===Photopath===
140521\img-20210513-wa0004.jpg
===Caption===
परिचारीकांनी कोरोना काळात गावात केलेल्या कामाची दखल घेऊन जखिणवाडी ग्रामस्थांनी नांदलापूर उपकेंद्रातील परिचारीकांचा मेडिकल साहित्य देऊन सन्मान केला ( छाया- माणिक डोंगरे)