लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सार्वजनिक ठिकाणी एखाद्याला चुकीचं करू नको, असं सांगणही अलीकडे कठीण झालं आहे. कोण कसा उलट प्रतिसाद देर्इल, याचा नेम नाही, असाच काहीसा प्रकार साताऱ्यात घडलाय.सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणाऱ्या चाैघांना जीम इन्स्टक्टरनं ‘इथेगांजा ओढू नका,’ इतकच सांगितलं. या कारणावरून चाैघांनी जीम इन्स`ट्रक्टरला इतकं मारलं की त्यांच्या अंगावर अंगभर जखमा झाल्या. आता मारहाण करणाऱ्या चाैघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
याबाबत अधिक माहिती अशी की, जीम इन्स`ट्रक्टर अरूण भोसले (वय ३६, रा. केसरकर पेठ, सातारा) हे नगर पालिकेजवळील एका मेडीकल समोर दि. १ रोजी रात्री पावणेअकरा वाजता उभे होते. त्या ठिकाणी चाैघेजण गांजा ओढत होते. हे पाहून अरूण भोसले यांनी त्यांना गांजा ओढू नका, असं सांगितलं. या कारणावरून श्रीसनीवंजारी याने भोसले यांच्या कानावर सिमेंटचा पेवर ब्लाॅक मारला. तरवंजारीचे मित्र अभिषेक पाटोळे व इतर दोघांनी त्यांच्या हातातील काचेच्या तुकड्याने तसेच सिमेंटच्या पेवरने भोसले यांच्या पाठीवर, मानेवर, पोटावर, कमरेवर आदी ठिकाणी मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्यांच्या चष्म्यावर पाय देऊन चष्मा फोडून नुकसान केले. यामध्ये भोसले हे जखमी झाले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात वरील चाैघांविरोधात फिर्याद दिली. या तिघांचे संपूर्ण पत्ता, नाव काय आहे, हे भोसले यांना माहिती नाही.
दरम्यान, समाजात अशा प्रकारचं वाईट कृत्य घडत असेल तर तेरोखलं जाणं प्रत्येकाचं कर्तव्य असते. केवळ बघ्याची भूमिका घेऊन दुर्लक्ष केले नाही पाहिजे. पण दुसरीकडे समाजातील अशा काही व्यक्ती पुढे येतात पण त्यांनाच असे वाईट अनुभव येत असल्याने पुन्हा अशा घटना घडत असतील तर अशा घटना रोखण्यासाठी कोणी पुढे येणार नाही. असे पोलिस सांगतायत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"