विनाकारण माझ्या नादी लागणाऱ्यांना सोडत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:33 AM2021-07-25T04:33:09+5:302021-07-25T04:33:09+5:30

म्हसवड : ‘माण तालुक्यातील किरकसाल बोगद्यातून २०१४ मध्ये सर्वप्रथम उरमोडीचे पाणी आणले. तेव्हापासून हे पाणी पुढे नेत दरवर्षी वंचित ...

I don't leave my nadis for no reason | विनाकारण माझ्या नादी लागणाऱ्यांना सोडत नाही

विनाकारण माझ्या नादी लागणाऱ्यांना सोडत नाही

googlenewsNext

म्हसवड : ‘माण तालुक्यातील किरकसाल बोगद्यातून २०१४ मध्ये सर्वप्रथम उरमोडीचे पाणी आणले. तेव्हापासून हे पाणी पुढे नेत दरवर्षी वंचित गावांची तहान भागवायचे काम करतोय, मात्र माणच्या मातीशी आणि जनतेशी बेईमानी करणारे काहीजण विनाकारण श्रेय लाटत आहेत. मी कधी कुणाच्या नादाला लागत नाही, विनाकारण माझ्या नादाला कुणी लागला तर मात्र सोडतही नाही. मतदारसंघातील जनतेशी आणि इथल्या मातीशी बेईमानी कराल तर गाठ माझ्याशी आहे,’ असा इशारा आमदार जयकुमार गोरे यांनी दिला.

वरकुटे मलवडी येथे तुटकाकडा तलावात आलेल्या उरमोडीच्या पाण्याच्या पूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, आप्पासाहेब पुकळे, विलास देशमुख, शेनवडीचे माजी सरपंच मोहन कदम, सरपंच उमेश आटपाडकर, माजी सरपंच रामचंद्र नरळे, डॉ. आनंदराव खरात, माजी चेअरमन कांतीलाल खांडेकर, सदाशिव बनगर, किरण जाधव, सतीश आटपाडकर, दत्तात्रय चव्हाण, सुरेश यादव, बादशहा इनामदार, दाऊद इनामदार, गणेश चव्हाण उपस्थित होते.

आमदार गोरे म्हणाले, ‘मी माणदेशी जनतेची आणि इथल्या मातीची तहान भागविण्याचा शब्द देऊन राजकारणात आलो. जनतेने माझ्यावर विश्वास दाखविला आणि मला सलग तीन वेळा आमदार केले. माझ्या राजकीय कारकिर्दीतला प्रत्येक दिवस मी मतदारसंघात पाणी आणणे आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठीच खर्ची घातला आहे. बारामती, फलटण, सातारा, कऱ्हाडमधील अनेकांना माण, खटावला पाणी द्यायचेच नव्हते, म्हणूनच त्यांनी जयकुमारला अडवायचा आटोकाट प्रयत्न केला. आताही त्यांचे तसेच प्रयत्न सुरू आहेत.’

मतदारसंघातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या माझ्या प्रयत्नांना यश आले आहे. दरवर्षी अनेक गावांना उरमोडीचे पाणी पोहोचत आहे. वरकुटे मलवडी परिसराने माझ्यावर नेहमीच विश्वास दाखविला आहे. या भागासाठी तारळीच्या कॅनॉलने हे पाणी आणले आहे. २००९ पासून माझ्या प्रयत्नाने या कॅनॉलच्या कामासाठी कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. दोन वर्षांपूर्वी राजकारणात आलेला एक आणि आठ वर्षे माझ्या मागे फिरणारा दुसरा पाण्याचे श्रेय घेण्याचा आटापिटा करत आहेत. जयकुमारला थांबविणे हा एकमेव अजेंडा घेऊन एकत्र आलेल्यांना माणची स्वाभिमानी जनता कधीच स्वीकारणार नाही, असा विश्वासही शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केला.

फोटो : २४तांबडाकडा

वरकुटे मलवडी येथील तुटकाकडा तलाव येथे उरमोडीच्या पाण्याचे पूजन आमदार जयकुमार गोरे, शिवाजीराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

240721\1857-img-20210724-wa0052.jpg

फोटो :

वरकुटे मलवडी येथील तुटका कडा तलाव येथे उरमोडीच्या पाण्याचे पूजन करताना आ. जयकुमार गोरे

शिवाजीराव शिंदे आणि मान्यवर.

Web Title: I don't leave my nadis for no reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.