राजकीय नेत्यांनी जर हस्तक्षेप केला नाही तर... तो गावात येणार नाही... आरोग्य यंत्रणा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 12:32 PM2020-04-24T12:32:06+5:302020-04-24T12:33:12+5:30
कोरोना हा केवळ एकमेकांच्या संसर्गाच्यामुळे होतो. तो टाळण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी लागू केली आहे. परजिल्ह्यातून कोणी येऊ नये, म्हणून जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. गावपातळीवर ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य यंत्रणा व पोलीस सतर्क असल्याने अनेक गावांनी सुरक्षित ठेवण्यात यश मिळवले आहे.
खटाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यातूनही अनेकजण पुणे, मुंबईहून स्वगृही परतले आहेत. त्यांनी शासकीय यंत्रणेकडे नोंद करणे गरजेचे आहे. त्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी थांबण्यास सांगितले जाते; पण अनेक तरुण विविध कारणं देऊन शिक्का न मारण्याची विनंती करत आहेत. त्यातीलच एक म्हणजे आई आजारी आहे. बाहेर जाता येणार नाही.
कोरोना हा केवळ एकमेकांच्या संसर्गाच्यामुळे होतो. तो टाळण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी लागू केली आहे. परजिल्ह्यातून कोणी येऊ नये, म्हणून जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. गावपातळीवर ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य यंत्रणा व पोलीस सतर्क असल्याने अनेक गावांनी सुरक्षित ठेवण्यात यश मिळवले आहे.
खटावला याला अपवाद ठरला आहे. अनोळखी लोकांचा वावर वाढला असल्यामुळे स्थानिकांच्या मनात मात्र भीतीचे वातावरण दिसून येत आहे. आरोग्य विभाग आता डोळ्यात तेल घालून काम करत आहेत. त्यांना आशा सेविका, अंगणवाडी सेविकाचे चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत आहे. कोणत्याही घरात अनोळखी तसेच बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीवर त्या बारकाईने नजर ठेवून आहेत. कोणी आढळल्यास त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र्रात जाऊन तपासणी करून घेण्यासाठी तगादा लावत आहेत. परंतु त्यांच्याही हातावर तुरी देण्याचे काम काही महाभाग करत आहेत.
बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला होम क्वारंटाईनचा शिक्का मारणे बंधनकारक आहे. हा शिक्का मारला तर मोकळेपणाने फिरण्यावर निर्बंधे येतील, यातून सुटका करण्यासाठी होम क्वारंटाईन असतानासुद्धा हातावर शिक्का न मारण्यासाठी आरोग्य कर्मचारी व संबंधित विभागातील डॉक्टर यांना या कामात स्थानिक नेते व पदाधिकारी हस्तक्षेप करून अडचणी वाढवत आहेत.
.
शासकीय नियमांचे कठोर पालन व्हावे
वास्तविक, ग्रामीण भागात अजून कोरोनाने शिरकाव झालेला नाही. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांना घरातच बसवले तर त्यांच्यामुळे इतरांना धोका पोहोचणार नाही. मात्र कारवाई करण्यात आरोग्य विभागापुढे अडचणी येत आहेत. राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने मात्र तो लवकरच गावात यायला कमी करणार नाही, अशी प्रतिक्रिया सध्या शासनाने लावलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणा-या सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे