सातारा : अलीकडे लग्न समारंभामध्ये आणि प्री वेडिंगसाठीही ड्रोनचा वापर होऊ लागला आहे. मात्र, अशाप्रकारे लग्न समारंभात ड्रोनचा वापर करायचा असेल तर पोलीस ठाण्याची परवानगी घ्यावी लागते. अन्यथा कारवाइ होऊ शकते. त्यामुळे लग्नाच्या शुटींगसाठी ड्रोन वापरणार असाल तर लग्न आयोजकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.लग्न समारंभामध्ये फोटो शूट करण्यासाठी अनेक पर्याय शोधले जातात. उंचाव उभे राहून फोटो काढून लग्न मंडपाची आणि तेथील झगमगटाची प्रचिती येण्यासाठी अशाप्रकारे फोटो शूट केले जात असत. मात्र, अलीकडे ड्रोनच्या सहायाने लग्नसमारंभाचे फोटो शूट केले जात असल्याचे आपल्याला पाहिला मिळते. प्री वेडिंग असो की लग्नातील सर्व फोटो असो, हे ड्रोनद्वारेच काढले जात आहेत.
हे प्रमाण वाढले आहे. मात्र, ड्रोनचा वापर करायचा असेल तर पोलिसांची परवानगी घेणे गरजेचे असते. अनेकदा पोलिसांचा कागदोपत्री ससेमिरा चुकविण्यासाठी ड्रोनची परवानगी घेतली जात नाही. मात्र, हे लग्न आयोजक आणि संबंधित ड्रोनधारकांवर कारवाइतून बेतण्यासारखे आहे. त्यामुळे ड्रोनची परवानगी घेणे आवश्यकच आहे. ड्रोन उडवण्यासाठी लायसन हवे!ड्रोन उडविण्यासाठी आता लायसनची आवश्यकता असते. दहशतवाद्यांनी या ड्रोनचा वापर केल्यापासून ड्रोन वापरण्यावर निंबध आले आहेत.आपल्या परिसराची माहिती या ड्रोनद्वारे दहशतवादी मिळवू शकतात. किंवा एखादा बॉम्ब हल्लाही होऊ शकतो. त्यामुळे ड्रोन उडविण्यासाठी लायसनची गरज आहे. ड्रोन उडविण्याचे नियम
- या नियमांनुसार, ड्रोनचं ५ प्रकारांत वर्गीकरण करण्यात आलंय. त्यानुसार वजन पाहून ड्रोन खरेदीचा निर्णय घ्या.
- नॅनो ड्रोन २५० ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी वजन
- मायक्रो ड्रोन २५० ग्रॅम ते २ किलोपर्यंतच वजन
- लहान ड्रोन २ किलो ते २५ किलोपर्यंत वजन
- मध्यम ड्रोन २५ किलो ते १५० किलोपर्यंत वजन
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ड्रोनच्या वापरासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. ड्रोनचा वापर करायचा असेल तर या नियमांची माहिती हवी आणि त्याप्रमाणे नोंदणी करायला हवी. नाहीतर कारवाई होऊ शकते. या नियमांनुसार, ड्रोनचं ५ प्रकारांत वर्गीकरण करण्यात आलंय. त्यानुसार वजन पाहून ड्रोन खरेदीचा निर्णय घ्या. नॅनो सोडून इतर ड्रोन उडवण्यासाठी डीजीसीएची परवानगी आवश्यक असते. दोनशे फुटांच्या वर मायक्रो ड्रोन उडवण्यासाठी स्थानिक पोलिसांची परवानगी आवश्यक असते. विमानतळ, आंतरराष्ट्रीय सीमा, संवेदनशील ठिकाणांपासून ठराविक अंतरावर ड्रोन उडवू शकता. अनेक संवेदनशील ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यास बंदी आहे.