सागर गुजर ।सातारा : कोरोना विपत्तीच्या काळात पुण्या-मुंबईतील अनेक धनिकांनी गावाकडे धूम ठोकली. ह्यधनिकाघरचे श्वान त्याला मालकाइतकाच मान...ह्ण या म्हणीचा प्रत्यय लॉकडाऊनच्या काळात आला. हे ह्यकोरोनावाहक घुसखोरह्ण लॉकडाऊनचे नियम तोडून जिल्ह्यात आलेच कसे? ह्यलक्ष्मीदर्शनह्ण दाखवून त्यांनी जर जिल्ह्यात घुसखोरी केली असेल तर अशा नतद्रष्टांना चांगलीच अद्दल घडणे आवश्यक असून, जिल्हावासीयांची आर्त हाक ऐकून जिल्हा प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
संपूर्ण देशभर २३ मार्चपासून लॉकडाऊनचा निर्णय घेतला. लॉकडाऊनचा अर्थ म्हणजे कुणीही आपले शहर, गाव सोडायचे नाही. राज्य व केंद्र शासनाने केलेल्या सूचनांनुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सातारा जिल्ह्याच्या सीमा सील केल्या. या लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातून बाहेर पडू पाहणारे ऊसतोड मजूर, उत्तर प्रदेश, राजस्थान आदी राज्यांतील बांधकाम, फर्निचर, पेंटिंग या कामासाठी सातारा जिल्ह्यात काम करणारे मजूर यांना जिल्हा प्रशासनाने थांबवून ठेवले. या सर्व विस्थापितांना निवारा केंद्रांत दाखल करण्यात आले. ज्यांनी जिल्हा, शहर सोडून जाण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर गुन्हेही दाखल केले.
हे एका बाजूला सुरू असतानाच पुणे-मुंबई येथून लपून-छपून येणाऱ्यांचे लोंढे थांबले नाहीत. मिळेल त्या वाहनाने हे लोक जिल्ह्यातील आपल्या गावात, शहरात परतत होते. आताही कोरोनाबाधित जे लोक आढळून येत आहेत, त्यातील बहुतांश लोक हे पुणे-मुंबईतून आलेलेच लोक आहेत. या लोकांनी आपली माहिती संबंधित प्रशासनाकडे दिली नसेल तर त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून घेणे आवश्यक आहे. महामार्गावर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून येत असताना या लोकांची तपासणी झाली नाही का? झाली असेल तर त्यांना प्रवेश कसा काय दिला? याचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
या कोरोनावाहक घुसखोरांमुळेच सातारा जिल्हा संकटात सापडलाय. गरीब माणूस मुकाट्याने कायद्याचे पालन करत असताना धनदांडगे मात्र शिरजोरी करून रोग पसरवत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाईचे शस्त्र जिल्हा प्रशासनाने उगारण्याची मागणी होत आहे.साताºयाच्या प्रशासनाने जीव तोडून मेहनत घेऊन कोरोनाला रोखून धरले आहे. या अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे महापाप काही वरिष्ठ प्रशासकीय महाभागांनी केलेले आहे. महाबळेश्वरात वाधवान कुटुंबीय अशाच प्रकारे दाखल झाले होते. वरिष्ठ अधिकाºयांचे पत्र दाखवून अनेकजण लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात शिरले. या सर्व प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी झाली पाहिजे.- चिन्मय कुलकर्णी, अध्यक्ष संकल्प सेवाभावी व इंजिनिअरिंग संस्थावरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकाºयांची शिफारस पत्रे दाखवून लोक लॉकडाऊनच्या काळात पुण्याची सीमा ओलांडून सातारा जिल्ह्यात प्रवेश करत होते. आम्ही टोलनाक्यांवर त्यांची तपासणी केली; परंतु अनेकजण असे पत्र दाखवत होते, अशी खळबळजनक माहिती एका शासकीय कर्मचाºयाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली