कंटेनरखाली अडकलेला जखमी अखेर सुखरूप !

By admin | Published: October 10, 2014 10:05 PM2014-10-10T22:05:01+5:302014-10-10T23:03:04+5:30

काळजाचा ठोका चुकला..चालकाचे प्रसंगावधान..

Injured under the container, finally get injured! | कंटेनरखाली अडकलेला जखमी अखेर सुखरूप !

कंटेनरखाली अडकलेला जखमी अखेर सुखरूप !

Next

सातारा : कंटेनरचा टायर अचानक फुटल्याने कंटेनर कारवर पडला. कारमध्ये अडकलेल्या चालकाला तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर नागरिक व पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले. हा अपघात गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास झाला.किरण गवळी (वय ३९), एकनाथ थोरात (दोघेही रा. कोडोली, ता. सातारा) अशी जखमींची नावे आहेत. हे दोघे कारमधून रात्री घरी जात होते. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अंजठा चौकात कार पोहोचली. याचवेळी शिवराज पेट्रोलपंपाकडून आलेला कंटेनर अचानक कारवर पडला. हा भीषण अपघात घडल्याची माहिती जस-जसी नागरिकांना मिळू लागली, तसे नागरिक घटनास्थळी येऊ लागले. पोलीस आणि रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या. केवळ कारचा मागचा भाग दिसत होता. संपूर्ण कार कंटेनरखाली चिरडली गेली होती. पोलिसांनी आणि नागरिकांनी प्रसंगावधान राखून कारच्या पाठीमागची काच फोडली. त्यानंतर पहिल्यांदा एकनाथ थोरात यांना बाहेर काढण्यात यश आले. त्यांच्या हाताला आणि तोंडावर जखमा झाल्या होत्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चालक किरण गवळी हे कारमध्येच अडकले होते. आतून ते हाताने पत्रा वाजवून आवाज देत होते. भला मोठा कंटेनर त्यांच्या कारवर कोसळल्याने घटनास्थळीचे चित्र विदारक दिसत होते. कंटेनर उचलण्यासाठी दोन क्रेन मागविण्यात आल्या. तोपर्यंत गवळी आतमध्ये अडकून पडले होते. अखेर दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर किरण गवळी यांना चक्काचूर झालेल्या कारमधून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. (प्रतिनिधी)

काळजाचा ठोका चुकला..
दोन क्रेनच्या साह्याने कंटेनर वर उचलण्याचा प्रयत्न सुरू होता. याचवेळी एका क्रेनची तार अचानक तुटली आणि थोडाफार वर उचललेला कंटेनर पुन्हा कारवर जोरदार आदळला. यावेळी तेथे उपस्थितांच्या काळाजाचा ठोका चुकला. कंटेनरमध्ये नव्या कोऱ्या नऊ गाड्या होत्या. त्यामुळे कंटेनरचे वजन आणखीनच जास्त होते. पुन्हा एकदा क्रेनने कंटेनर वर उचलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता गवळी यांचे हात धरून त्यांना ओडतच नागरिक व पोलिसांनी बाहेर काढले. गवळी सुखरूप असल्याचे पाहून अनेकांच्या अंगावर शहारे आले. दैव बलवत्तर म्हणूनच त्यांचा जीव वाचला.

चालकाचे प्रसंगावधान..
कंटेनर पडल्यानंतर गवळी यांनी तत्काळ सीट पाठीमागे घेतली. कारचे स्टिअरिंग मांडीवर रुतले होते. अशा परिस्थितीतही त्यांनी संयम सोडला नाही. जखमी एकनाथ थोरात यांना एका हाताने त्यांनी पाठीमागच्या शीटवर ढकलले. त्यामुळे थोरात यांचा जीव वाचला.

Web Title: Injured under the container, finally get injured!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.