आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:39 AM2021-07-28T04:39:49+5:302021-07-28T04:39:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा विद्यार्थी आदित्य राजेश मोरे याने लिहिलेला शोधनिबंध अमेरिकेतील ...

In international journals | आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये

आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा विद्यार्थी आदित्य राजेश मोरे याने लिहिलेला शोधनिबंध अमेरिकेतील ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्मसी अँड फार्मकॉलॉजी’ या विज्ञानविषयक जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

‘अल्टरनेटीव्ह डेट रेप ड्रग’ असे शीर्षक असलेल्या या शोधनिबंधात अमली पदार्थ मानवी जठरातील आम्लात विरघळण्याच्या क्षमतेचा ऊहापोह केला आहे. मोठमोठ्या पार्ट्या तसेच नाईट क्लबमध्ये गुंगीच्या औषधांचा गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणावर वापर होतो. हे विशेष ड्रग घेतल्याने वास्तव आणि कल्पना यातील फरक कळत नाही आणि मुली दुष्कृत्यांना बळी पडतात. या महत्त्वपूर्ण बाबींवर आदित्यने प्रकाश टाकला आहे.

फॉरेन्सिक सायन्स शाखेच्या शेवटच्या वर्षात आदित्य शिकत असून, या शोधनिबंधात स्मितेश नलगे आणि डॉ. अनिता माळी यांनी योगदान दिले. कॅनडा, जपान, चीन, स्पेन, अमेरिका, इटली आदी देशांमधील संशोधकांनी संपादक या नात्याने आदित्यचा शोधनिबंध या जर्नलमध्ये स्वीकारला आहे.

फोटो : २७ आदित्य मोरे

Web Title: In international journals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.