निवेदनात म्हटले आहे की, रामचंद्र चव्हाण यांचे पक्के घर नसताना व एकत्र कुटुंब नसताही पक्के घर आहे व एकत्र कुटुंब आहे असे अधिकारी यांनी दाखवले आहे.त्यामुळे गरजू माणसाला लाभ मिळाला नाही. विस्तार अधिकाऱ्यांना खरी माहिती देऊनही त्याकडे लक्ष दिले नाही. तरी यात लक्ष घालावे.
दोषींवर कारवाई करावी.
-----------------------------
तंत्रशिक्षण सहसंचालकांची भेट
कऱ्हाड : येथील शासकीय औषधनिर्माण महाविद्यालयास तंत्रशिक्षण सहसंचालक डाॅ. दत्तात्रय जाधव यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी प्राचार्य डाॅ. के. बी. बुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सहसंचालक जाधव म्हणाले, आपला देश कृषिप्रधान आहे. विज्ञान व तंत्रज्ञान युगात विकासाचा सर्वाधिक भार शेतीवर आहे. तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम विद्यार्थी घडवून औद्योगिक क्षेत्रात प्रगती करता येईल. त्यासाठी चांगले विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांनी करावे.
यावेळी डाॅ. एम. एस. चरडे, डी. के. कांबळे, डाॅ. ए.एच. होसमनी, डाॅ. आर. जे. डायस, डाॅ. आर. डी. चकोले, प्रा. वाय. एन. गव्हाणे, प्रा. आय. एस. रितापुरे आदींची उपस्थिती होती.