‘आयपीएल’वर सट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:21 AM2018-05-15T00:21:58+5:302018-05-15T00:21:58+5:30

IPL betting on IPL | ‘आयपीएल’वर सट्टा

‘आयपीएल’वर सट्टा

Next


कºहाड : आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या पाचजणांना पोलिसांनी अटक केली. शहरातील रविवार पेठेत असणाºया कोष्टी गल्लीत सोमवारी दुपारी साताºयाच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या सट्टेबाजांकडून पोलिसांनी दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
संदीप शशिकांत पवार (वय ३३, रा. रविवार पेठ, कºहाड), अमोल शंकर दावणे (२९, रा. बाराडबरी झोपडपट्टी, कºहाड), विजय विलास चव्हाण (३५, रा. सोमवार पेठ, कºहाड), अमोल जयवंतराव पवार (३५, रा. रविवार पेठ, कºहाड), विजय विष्णू वायदंडे (३५, रा. बुधवार पेठ, कºहाड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गत महिन्यापासून ‘आयपीएल २०१८’ या क्रिकेट मॅच सुरू आहेत. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण टीव्हीद्वारे दाखविले जात आहे. कºहाडात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावला जात असल्याची माहिती साताºयाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. त्या अनुषंगाने त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह कर्मचाºयांचे एक पथक तयार करून या माहितीची खातरजमा करण्याची सूचना दिली. पथकाने साध्या वेशात शहरामध्ये फिरून याबाबत माहिती संकलित केली. त्यावेळी रविवार पेठेतील कोष्टी गल्लीत सट्टा लावला जात असल्याची खात्री झाली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
गुन्हे शाखेचे पथक सोमवारी दुपारी तातडीने कºहाडात दाखल झाले. त्यांनी कोष्टी गल्लीत एका घराच्या आडोशाला अचानक छापा टाकला. त्यावेळी संदीप पवार हा आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेत असल्याचे आढळून आले. तसेच सट्टा लावण्यासाठी आलेल्या इतर चारजणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबतची नोंद कºहाड शहर पोलिसांत झाली आहे.
विजेत्यास हजारला हजार रुपये
संदीप पवार याने संघांवर सट्टा म्हणून सोमवारी मोठी रक्कम जमा केली होती. विजयी संघावर पैज म्हणून तो हजार रुपयांना हजार रुपये अशी रक्कम देणार होता. मात्र, पोलिसांनी छापा टाकून सट्टेबाजांना गजाआड केले. त्यांच्याकडून ९२ हजार ६०५ रुपयांची रोकड तसेच एक लाख ८ हजार ५०२ रुपयांचे आठ मोबाईल असा २ लाख १ हजार १०७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Web Title: IPL betting on IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.