‘खाकी’च्या बंदोबस्तात रंगली खादीची सभा, सातारा -गोंधळात ३३ विषयांना मंजुरी : चोवीस आरोग्य कर्मचाºयांच्या बोगस भरतीवर वसंत लेवे यांचा आक्षेप-सातारा पालिका सर्वसाधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:21 AM2018-01-12T01:21:51+5:302018-01-12T01:22:18+5:30

सातारा : मागील सभेवेळी नगरसेवकांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Khadi meeting organized in Kharka, Satara - 33 approved subjects in Gaya: Vot leve's objection to bogus recruitment of twenty-four health workers - Satara municipality general meeting | ‘खाकी’च्या बंदोबस्तात रंगली खादीची सभा, सातारा -गोंधळात ३३ विषयांना मंजुरी : चोवीस आरोग्य कर्मचाºयांच्या बोगस भरतीवर वसंत लेवे यांचा आक्षेप-सातारा पालिका सर्वसाधारण सभा

‘खाकी’च्या बंदोबस्तात रंगली खादीची सभा, सातारा -गोंधळात ३३ विषयांना मंजुरी : चोवीस आरोग्य कर्मचाºयांच्या बोगस भरतीवर वसंत लेवे यांचा आक्षेप-सातारा पालिका सर्वसाधारण सभा

googlenewsNext

सातारा  : मागील सभेवेळी नगरसेवकांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सिमेंट काँक्रीटचे रस्ते, वारंवार बांधण्यात येणारे शॉपिंग सेंटर आणि आरोग्य कर्मचाºयांच्या झालेल्या बोगस भरतीवर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. परंतु या गोंधळातच १ विषय वगळता ३३ विषयांना मंजुरी देण्यात आली.

दीड महिन्यापूर्वी झालेल्या सभेत विरोधी पक्षनेते अशोक मोने आणि माजी आरोग्य सभापती वसंत लेवे यांच्यात धक्काबुक्की झाली होती. त्यामुळे याही सभेत तणावाची परिस्थिती उद्भवू शकते, असे पालिका प्रशासनाला वाटल्याने त्यांनी या सभेला पोलिस बंदोबस्त मागविला. सभागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर वर्दीतील तर आतमध्ये साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात आले होते.

अकरा वाजता सभा सुरू झाल्यानंतर मागील सभेवेळचा वृत्तांत वाचून दाखविताना जिल्हाधिकाºयांना सादर केलेला अहवाल सभागृहात खुला करा, अशी मागणी विरोधकांनी केल्याने काहीकाळ सभागृहात गोंधळ निर्माण झाला. ही न्यायप्रविष्ट बाब असल्याने मागील सभेचा अहवाल सांगता येणार नाही, असे उत्तर मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिल्यानंतर पुढील विषयांवर चर्चा सुरू झाली.

सातारा शहरातील सर्व रस्ते काँक्रीटीकरण करण्याचा प्रस्ताव चर्चेला आल्यानंतर नगरसेवक अशोक मोने, भाजपचे गटनेते धनंजय जांभळे यांनी कडाडून विरोध केला. तीन महिन्यांपूर्वीच शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे, असे असताना आता पुन्हा काँक्रीटीकरणाचा घाट कशासाठी? असा प्रश्न मोने यांनी उपस्थित केला. रस्ते खोदून पुन्हा पालिकेचेच नुकसान होणार आहे. टेलिफोन, वीज वितरण आणि पाणीपुरठा विभाग या सर्वांचा विचार करणे गरजेचे आहे.
धनंजय जांभळे म्हणाले, ‘रस्ते काँक्रीटीकरणाला आमचा विरोध नाही. मात्र सर्व सदस्यांना विचारात घेणे आवश्यक होते. चार भिंतीच्या आत निर्णय घेऊन पालिकेचेच नुकसान होत आहे. नगरसेवकांचा मारामारीचा आदर्श घ्यायचा का,’ असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर साविआचे दत्ता बनकर, वसंत लेवे यांनी आक्षेप घेत जांभळे यांच्या वक्तव्यावर विरोध केला.
अग्निशामक दोन वाहने खरेदी करण्यावरूनही सभेत खडाजंगी झाली. सध्या पालिकेत असणाºया गाड्या क्लिनर चालवत आहेत. अगोदर चालक नेमा, विनाकारण पालिकेची आर्थिक गुंतवणूक नको, एखादा अपघात झाल्यास त्याला कोण जबाबदार राहणार? असा प्रश्न मोने यांनी उपस्थित केला. मात्र बहुमताने हाही विषय मंजूर करण्यात आला.

शॉपिंग सेंटर बांधण्याचा घाट कशासाठी
सातारा शहरात गेल्या चार वर्षांत सात व्यापारी संकुले बांधून रिकामी पडली आहेत. तरी सदर बझार व सोमवार पेठ येथे पुन्हा व्यापारी संकुले बांधण्याच्या व्यवस्थापनाच्या तयारीवर नगरसेवक अशोक मोने व भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. ‘सातारा कॉम्प्लेक्स शहर बनायला लागले; पण त्याचा पालिकेला उपयोग नाही,’ असा टोला त्यांनी लगावला. अशोक मोने यांनी सदर बझारच्या व्यापारी गाळ्यात मंडई तर सोमवार पेठेत कस्तुरबा रुग्णालयाच्या इमारतीत सुविधा उपचार केंद्र कायमस्वरुपी चालावे, अशी सूचना केली.
४५ मिनिटांसाठी नगराध्यक्ष !
ागराध्यक्षा माधवी कदम यांना अचानक काही कारणास्तव सभा सोडून जावे लागले. त्यामुळे उर्वरित ९ विषयांसाठी उपनगराध्यक्ष राजू भोसले यांना पिठासन अधिकारी म्हणून नेमण्यात आले. सुमारे ४५ मिनिटे राजू भोसले यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसण्याचा मान मिळाला.

२४ कर्मचाºयांची भरती कशी झाली?
माजी नगराध्यक्ष सचिन सारस यांच्या काळात ६९ सफाई कर्मचारी भरती झाली. यावेळी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. त्याची चौकशी नगरपरिषद संचालनालयाने लावली. त्या पत्राचा गौप्यस्फोट माजी सभापती वसंत लेवे यांनी सभागृहात केला. २४ आरोग्य कर्मचाºयांची भरती कशी केली? असा प्रश्न लेवे यांनी केला. आस्थापना प्रमुख अरविंद दामले यांना उत्तरे देताना प्रचंड दमछाक झाली. यानंतर त्यांनी अहवाल वाचला.


 

Web Title: Khadi meeting organized in Kharka, Satara - 33 approved subjects in Gaya: Vot leve's objection to bogus recruitment of twenty-four health workers - Satara municipality general meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.