जानकरांनी धनगर समाजाचा विश्वासघात केला

By admin | Published: October 12, 2014 12:44 AM2014-10-12T00:44:57+5:302014-10-12T00:44:57+5:30

जयकुमार गोरे : म्हसवड येथे हर्षवर्धन पाटील यांची सभा; विरोधकांचा खरपूस समाचार

Knowingly betrayed the Dhangar community | जानकरांनी धनगर समाजाचा विश्वासघात केला

जानकरांनी धनगर समाजाचा विश्वासघात केला

Next

म्हसवड : ‘माण-खटाव या दुष्काळाने होरपळणाऱ्या तालुक्यात पाणी आणण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला; पण धनगर समाजाचा विश्वास करणारे जानकर साहेब काय करतात? भंडाऱ्याला जागणाऱ्या धनगर समाजाला पाचपैकी एकही तिकीट त्यांनी का दिले नाही? ज्यांना दिली ती कशी दिली,’ असे सवाल उपस्थित करून जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. म्हसवड येथे प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, भगवानराव गोरे, अंकुश गोरे, भारती गोरे, सोनिया गोरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, अर्जुन काळे, नगराध्यक्ष विजय सिन्हा, उपनगराध्यक्ष डॉ. वसंत मासाळ, पक्षप्रतोद विजय धट, तालुकाध्यक्ष संजय जगताप उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘विधानसभेत माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांचे दुखणे पोटतिडकीने मांडणारा आणि येथील प्रश्न सोडविण्यासाठी लागेल तेवढा निधी हक्काने मागणारा लोकप्रतिनिधी म्हणून जयकुमार गोरेंची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. येथे बारमाही पाणी आणण्यासाठी जयकुमारच बारमाही आमदार हवा. राष्ट्रवादीचा सूर्य आता मावळला आहे. सूतगिरणीसाठी आमच्या सरकारकडून मदत घेणारे स्वार्थी लोक सोडून गेले. धनगर आरक्षणाचा प्रश्न काँग्रेस मार्गी लावेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जयकुमार गोरे म्हणाले, ‘बारामती, फलटण, कोरेगावमधून मला चक्रव्यूहात अडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निष्क्रियांची दुकानदारी बंद करणारा जयकुमार विरोधकांना डोईजड होतोय म्हणून त्यांनी ताकद लावली आहे. पण, जनतेच्या पाठबळावर विरोधकांचे चक्रव्यूह भेदून विधानसभेत जाणार आहे,’ असा विश्वास गोरे यांनी व्यक्त केला. यावेळी धनगर समाजाचे नेते दादासाहेब राजगे, माजी उपनगराध्यक्ष अशोकराव भोरे, राजेंद्र लिंगे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (प्रतिनिधी)

Web Title: Knowingly betrayed the Dhangar community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.