रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:39 AM2021-04-25T04:39:27+5:302021-04-25T04:39:27+5:30
......... जिल्ह्यात एकीकडे कोरोना संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मात्र नागरिकांची बेफिकिरी दिसून येत आहे. अनेकजण मॉर्निंग वॉकला बाहेर ...
.........
जिल्ह्यात एकीकडे कोरोना संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मात्र नागरिकांची बेफिकिरी दिसून येत आहे. अनेकजण मॉर्निंग वॉकला बाहेर पडत असताना दिसत आहेत. अशा लोकांवर खरंतर कारवाई होणे गरजेचे आहे तरच कोरोनाची ही लाट आटोक्यात येईल. गत काही दिवसांपासून सायंकाळच्या सुमारासही अनेकजण घराबाहेर वॉकिंगसाठी पडत आहेत. अशा लोकांवरही कारवाई होणे गरजेचे आहे. तरच ही दुसरी कोरोनाची लाट आटोक्यात येईल. सातारा शहरात हीच परिस्थिती असून अनेकजण समर्थ मंदिर परिसरातील पावर हाऊस रस्त्यावर तसेच कुरणेश्वर रस्त्यावर चालत असताना दिसून येत आहेत. यामध्ये व वयोवृद्धांपासून तरुण मुलांचाही समावेश आहे.
.........
.........
जिल्ह्यातील विविध केंद्रांवर शनिवारी नेहमीपेक्षा कमी लोकांना डोस देण्यात आला. लसीचा तुटवडा जाणवल्याने आरोग्य विभागाने काही केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आता केवळ ९ हजार डोस शिल्लक राहिले असून रविवारी लसीकरण मोहीम नेमकी कशी सुरू ठेवायची, असा प्रश्न आरोग्य विभागाला पडला आहे. पुण्याहून येतानाच कमी डोस येत आहेत. हे डोस केवळ तीन दिवसांत संपून जात आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाला लसीकरणासाठी वेग घेता येईना. लस उपलब्ध झाली नाही तर संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण बंद ठेवावे लागणार आहे.