पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावातील पाणी पातळी वेगाने खालावत चालली असून सद्यस्थितीला तलावात नऊ फुटाहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. तलावात काही ठिकाणी उघड्या पडलेल्या जमिनीमुळे चोहोबाजूला पाणी व मधोमध जमिनीचा लांब असा काहीसा भाग उघडा दिसत असल्याने, कास तलावावर बेटाचे स्वरूप साकारल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
सातारा शहराला कास व शहापूर योजनेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. शहराच्या काही भागात कास तलावाद्वारे पाणीपुरवठा होतो. शहराला दररोज होत असणारा पाणीपुरवठा व उष्णतेची तीव्रता वाढत जाऊन पाणी पातळी खालावत जाऊन साधारण जानेवारी महिन्याच्या पंधरवड्यात तलावाचा पहिला व्हॉल्व्ह उघडा पडतो, तर मे महिन्यादरम्यान दुसरा व्हॉल्व्ह उघडा पडून शहराचा पाणीपुरवठा तिसऱ्या व्हॉल्व्हवर येतो.
पावसाळ्यात साधारण जुलै महिन्याच्या आसपास मान्सूनच्या मुसळधार पावसात कास तलाव पूर्ण क्षमतेने भरून साधारण जूनच्या अखेरीस अथवा जुलैच्या सुरुवातीस सांडव्यावरून तीन ते चार फूट उंचीपर्यंत पाणी पडून वाहत असते. दरम्यान, सर्वत्र कास तलाव पाण्याने काठोकाठ भरलेला पाहायला मिळतो. त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून हळूहळू पाणी पातळी खालावण्यास सुरुवात होते. साधारण एप्रिल महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर पाणी पातळी खालावून काही ठिकाणी तलावाच्या काठाच्या जमिनी उघड्या पडू लागतात. यावेळी कास तलावावर बेट साकारल्याचे चित्र दिसून येते. त्यानंतर आणखी काही दिवसांनी पाणी पातळी खालावून स्वीमिंग टँक साकारल्याचेही चित्र दिसून येते.
०५कास
फोटो कॅप्शन :
कास तलावाच्या पाणी पातळीत घट होत असल्याने काठाच्या जामिनी उघड्या पडू लागल्या असल्याने जणू काही कासवर बेटच साकारल्याचे चित्र दिसत आहे.
(छाया : सागर चव्हाण )