पिंपोडे बुद्रुकमध्ये सुसज्ज रुग्णालयासाठी पाठपुरावा करू : रणजितसिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:02+5:302021-06-09T04:48:02+5:30
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी वाठार स्टेशन व पिंपोडे बुद्रुक येथील कोरोना सेंटरला भेट देऊन आढावा ...
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी वाठार स्टेशन व पिंपोडे बुद्रुक येथील कोरोना सेंटरला भेट देऊन आढावा घेतला. कोरोना परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार वेगाने निर्णय घेत आहे. कोरोना आजारात आरोग्य यंत्रणादेखील आश्वासक काम करत आहे. सर्वसामान्यांना तत्पर सेवा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर कोरेगावच्या नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळायला हवी. इतर वेळी रुग्णांना जादा पैसे खर्चून सातारा, वाई अशा ठिकाणी उपचार घ्यावे लागतात. ही अडचण लक्षात घेऊन सर्व उपचार एकाच ठिकाणी व्हावेत व लोकांचे पैसे वाचवावेत, याकरिता पिंपोडे ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करण्याची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय अधिकारी सूर्यकांत बाबर यांनी सांगितले.
त्यावर खासदार निंबाळकर यांनी सहमती दर्शवत त्यासाठी तातडीने पाठपुरावा केला जाईल, असे स्पष्ट केले. सायंकाळी साडेपाच वाजता त्यांनी वाठार स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पिंपोडे बुद्रुकच्या ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरची पाहणी केली. या वेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधत विचारपूस केली.
या वेळी दत्तात्रय धुमाळ, विजय चव्हाण, सूर्यकांत निकम, राजेंद्र धुमाळ, मनोज कलापट, सचिन जाधव, मंगेश शितोळे, नंदकुमार यादव, यशवंत पवार, विपुल चव्हाण, सूर्यकांत बाबर, डॉ. शिवराज कणसे, तलाठी शशिकांत सोनावणे उपस्थित होते.