लोकचळवळीतून साक्षर नागरिक घडवू या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:35 AM2021-01-18T04:35:00+5:302021-01-18T04:35:00+5:30
संविधान प्रचारक सातारा जिल्हा संयोजन गट व ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक, शैक्षणिक विकास संस्थेच्या वतीने आयोजित संविधान प्रचारक कार्यशाळेत सातारा, ...
संविधान प्रचारक सातारा जिल्हा संयोजन गट व ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक, शैक्षणिक विकास संस्थेच्या वतीने आयोजित संविधान प्रचारक कार्यशाळेत सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील सामाजिक संस्था, संघटना आणि युवा प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेत संविधान प्रचारक नागेश जाधव, संदीप आखाडे, वैशाली रायते, करिश्मा जाधव आणि ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत विविध विषयांवर गटचर्चा करण्यात आली. यामध्ये संविधान निर्मितीचा इतिहास, संविधानाची प्रास्ताविका, न्याय-स्वातंत्र्य-समता-बंधुता या विषयांवर मांडणी करण्यात आली. तर, खेळातून संविधान निर्मितीचा इतिहास व संविधानाची गरज याविषयी प्रबोधन करण्यात आले. त्याचबरोबर संविधानाप्रमाणे भारत कसा घडवावा, याबद्दल सखोल चर्चा झाली. भारत आणि भारतीय नागरिक घडण्याच्या या लोकचळवळीत सर्वांनी सहभागी होऊ या, असे आवाहन आनंदा थोरात यांनी केले.
संस्थेचे संचालक मधुराणी थोरात व सुनीता डाईंगडे यांनी स्वागत केले. अर्चना पाटील यांनी सूत्रसंचालन केले. बाजीराव पाटील यांनी आभार मानले.
फोटो : १७केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाडच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित संविधान प्रचारक कार्यशाळेत सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील संस्था प्रतिनिधी व युवा प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.