अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रश्न मार्गी लावू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:26 AM2021-06-26T04:26:21+5:302021-06-26T04:26:21+5:30

कुडाळ : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच भूमिका घेतली आहे. कोरोनाच्या संकटात संघाने केलेले काम ...

Let's solve the problem of All Maharashtra Primary Teachers Association | अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रश्न मार्गी लावू

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रश्न मार्गी लावू

googlenewsNext

कुडाळ : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच भूमिका घेतली आहे. कोरोनाच्या संकटात संघाने केलेले काम उल्लेखनीय असून, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेईल. तसेच प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून त्यांना न्याय देऊ,’ अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संघाच्या शिष्टमंडळास दिली.

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे, राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, संयुक्त सचिव दीपक भुजबळ, सातारा जिल्हाध्यक्ष संजीवन जगदाळे, नांदेडचे विजय पल्लेवाड यांच्या शिष्टमंडळाने हसन मुश्रीफ व वर्षाताई गायकवाड यांची भेट घेतली. या वेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात झाली.

या वेळी शिक्षकांच्या संचित अर्जित रजेचे रोखीकरण करावे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शिक्षकांना त्याचा लाभ दिला जावा. शिक्षकांच्या जिल्हातंर्गत व आंतरजिल्हा बदल्यांविषयी निर्णय घ्यावा, आदी मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे बदल्या करण्यास अडचणी येत असून, याबाबत लवकरच संघटना समन्वय समितीची बैठक बोलावून बदल्यासंदर्भात निर्णय घेऊ, अशी ग्वाही या वेळी मुश्रिफ यांनी दिली. तसेच शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाची बैठक बोलावून इतर प्रश्नासंदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

चौकट :

अनेक मागण्यांबाबत चर्चा...

शिक्षकांच्या वेतनासंबंधी सर्व जिल्हा परिषदांना सीएमपी प्रणाली लागू करावी, या मागणीचे निवेदन या वेळी देण्यात आले. याबाबत उपसचिवांना अहवाल सादर करण्याची सूचना मुश्रिफ यांनी केली. केंद्रप्रमुखांची पदे भरावीत, शिक्षकांसाठी आश्वासित प्रगती योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे प्रदान करावे, आदी मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.

Web Title: Let's solve the problem of All Maharashtra Primary Teachers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.