ठाकरे गटाकडून तसंच विरोधकांकडून सातत्यानं शिंदे गटातील आमदारांवर सातत्यानं टीका केली जात आहे. संजय राऊत यांनीदेखील अनेकदा शिंदे गटातील आमदारांवर टीका केली आहे. दरम्यान, त्यांना प्रत्युत्तर देताना मंत्री शंभूराज देसाईंनी जोरदार हल्लाबोल केला. “संजय राऊत म्हणणारे कोण? ते स्वातंत्र्यलढ्यात तीन महिने आत जाऊन आले का? कोणतं मोठं आंदोलन करून गेले होते, त्यांच्यावर कसला शिक्का आहे मग?,” असं म्हणत देसाई यांनी टीकेचा बाण सोडला.
“चौकशीतली जंत्री बाहेर आली तर… त्यांना म्हणा आता शांत बसा. तीन साडेतीन महिने आराम केलाय. आराम करायची सवय लागली आहे, बाहेर आल्यावर जास्त तणतण करू नका. सोसणार नाही तुम्हाला, प्रकृतीची काळजी घ्या म्हणावं,” असं देसाई म्हणाले.
कर्नाटक विषयावर भाष्यजत तालुक्याला कर्नाटक सरकारने तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी सोडण्याचा केलेला प्रकार खोडसाळपणाचा आहे. सीमा प्रश्न मुद्दाम चिघळवण्याचा या मागचा हेतू असल्याचेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयामध्ये सीमा प्रश्नांच्या संदर्भात महाराष्ट्र बाजू मांडताना कोठेही कमी पडणार नाही. महाजन आयोगाच्या अहवालाच्या तरतुदींचा अभ्यास करून कोणत्या मुद्द्यांवर भर द्यायचा या अनुषंगाने वकिलांच्या पॅनेलची बैठक घेण्यात आली आहे. त्या पद्धतीने समितीने मसुदा तयार केला आहे. ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे अजूनही वकिलांच्या पॅनेल समितीवर असून त्यांच्या वतीनेच बाजू मांडली जाईल. या प्रकरणांमध्ये समन्वयाने मार्ग काढला जावा, याकरता राज्याचे उच्च शिष्ट मंडळ भाजपच्या वरिष्ठ कार्यकारिणीला भेटायला दिल्लीत जाणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं.