राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 03:14 PM2020-02-06T15:14:20+5:302020-02-06T15:15:50+5:30

फलटण येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र मुलींचा संघ विजयी झाला. या संघाने गुजरात संघावर एक डाव पाच गुणांनी विजय मिळविला तर महाराष्ट्र मुलांच्या संघाने तेलंगणा संघावर एक डाव एक गुणाने विजय मिळवून विजेतेपद पटकावले.

Maharashtra team winner in National School Kho-Kho tournament | राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता

फलटण येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र मुलींचा संघ विजेता ठरला. (छाया : नसीर शिकलगार)

googlenewsNext
ठळक मुद्देतेलंगणा संघावर एक डाव एक गुणाने महाराष्ट्र संघ विजेता६५ व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेचा समारोप

फलटण : येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र मुलींचा संघ विजयी झाला. या संघाने गुजरात संघावर एक डाव पाच गुणांनी विजय मिळविला तर महाराष्ट्र मुलांच्या संघाने तेलंगणा संघावर एक डाव एक गुणाने विजय मिळवून विजेतेपद पटकावले.

फलटण नगरीत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ६५ व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेचा समारोप झाला.

या स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्याचे एकूण २७ मुला-मुलींच्या संघ सहभागी झाले होते. ६२२ खेळाडू तसेच संघ व्यवस्थापक, क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते. गेली चार दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढती रात्री उशिरा चुरशीच्या पार पडल्या.

समारोपप्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खो-खो संघटनेचे राज्याध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, क्रीडा व युवक सेवा, पुणे महाराष्ट्र राज्य आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव, खंडाळा तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर उपस्थित होते.

मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने गुजरातवर एक डाव पाच गुणांनी तर महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने तेलंगणा संघावर एक डाव एक गुणाने विजय मिळविला. तृतीय क्रमांकासाठी खेळविल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीच्या मुलांच्या संघाने आंध्रप्रदेशवर दोन गुणांनी विजय मिळविला. तर मुलींच्या पश्चिम बंगाल संघाने ओरिसावर दोन गुणांनी विजय मिळविला.

यावेळी मुलांमध्ये उत्कृष्ट संरक्षक, उत्कृष्ट आक्रमण व सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान अनुक्रमे महाराष्ट्राचा रवी वसावे, तेलंगणाचा व्ही. जनकीरम व महाराष्ट्राचा वैभव मोरे यांना तर मुलींमध्ये अनुक्रमे गुजरातची हर्षदा मकवाना, महाराष्ट्राच्या भाग्यश्री बडे व अंकिता लोहार यांना मिळाला.


 

Web Title: Maharashtra team winner in National School Kho-Kho tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.