Karad North Vidhan Sabha Election Result 2024 Live : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड; शरद पवारांचा शिलेदार ७३४४ मतांनी पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 10:31 AM2024-11-23T10:31:38+5:302024-11-23T10:38:11+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे मनोज घोरपडे १६८२९ एवढ्या मतांनी आघाडीवर आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Major developments in Karad North Assembly Constituency ncp balasaheb patil's trailing by 7344 votes | Karad North Vidhan Sabha Election Result 2024 Live : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड; शरद पवारांचा शिलेदार ७३४४ मतांनी पिछाडीवर

Karad North Vidhan Sabha Election Result 2024 Live : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड; शरद पवारांचा शिलेदार ७३४४ मतांनी पिछाडीवर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीचे कल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड समोर येत आहे. महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे ७३४४ एवढ्या मतांनी आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील पिछाडीवर आहेत. 

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी लढत झाली होती. या मतदारसंघात एकुण १५ उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बाळासाहेब पाटील  यांच्याविरोधात भाजपाचे मनोजदादा घोरपडे यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघात कोण बाजी मारणार या चर्चा सुरू आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: हाय व्होल्टेज लढतीत शरद पवारांचे पाच शिलेदार पिछाडीवर
 
१० वाजेपर्यंत कराड उत्तर मतदारसंघात तिसरी फेरी अखेर बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी) : ९४८५ महायुतीच्या मनोज घोरपडे (महायुती) : १६८२९ मनोज घोरपडे ७३४४ मतांनी आघाडीवर आहेत. 

कोल्हापूर दक्षिणमध्ये मोठी घडामोड

 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपाचे अमल महाडिक अशी लढत होत आहे. या विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीचे पहिल्या फेरीतील कल समोर आले आहेत. भाजपाचे अमल महाडिक यांनी आघाडी घेतली आहे. 

दक्षिण विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजता आलेल्या कलानुसार भाजपाचे अमल महाडिक यांनी २०१२ मतांनी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसचे ऋतुराज पाटील पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या फेरीतही ऋतुराज पाटील पिछाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीत ऋतुराज पाटील यांना ५७३३ एवढी तर तर भाजपाच्या अमल महाडिक यांना ६२७३ एवढी मत मिळाली आहेत. ९.३० पर्यंत आलेल्या कलानुसार अमल महाडिक यांनी ५४० मतांची आघाडी घेतली आहे. 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Major developments in Karad North Assembly Constituency ncp balasaheb patil's trailing by 7344 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.