मलकापूर नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात, भाजपचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 06:14 PM2019-01-28T18:14:54+5:302019-01-28T18:17:31+5:30

सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिकेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून नगराध्यक्षपदावरही काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला.भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे यांचा निसटता पराभव झाला.

Malkapur Municipal Council, BJP's defeat | मलकापूर नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात, भाजपचा पराभव

मलकापूर नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात, भाजपचा पराभव

Next
ठळक मुद्देमलकापूर नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात, भाजपचा पराभव काँग्रेसच्या नीलम येडगे यांना ७७४७ तर भाजपच्या डॉ. सारिका गावडे यांना ७४७७ मते

सातारा : सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिकेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून नगराध्यक्षपदावरही काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे यांचा निसटता पराभव झाला.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नीलम येडगे २७0 मतांनी विजयी झाल्या. शेवटच्या फेरीपर्यंत आघाडीवर असलेल्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे यांचा निसटता पराभव झाला. एका प्रभागात समान मते पडल्याने चिठ्ठी टाकुन देण्यात आलेल्या निकालातही काँग्रेस उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले.

नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या नीलम येडगे यांना ७७४७ तर भाजपच्या डॉ. सारिका गावडे यांना ७४७७ मते मिळाली. एकूण १५,३४३ मतदान झाले. त्यात ११९ जणांनी नोटाचा वापर केला.


माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पंढरपूर मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकीत काँग्रेसने १४ तर भाजपने ५ जागा जिंकल्या.


मलकापूर नगरपालिका निकाल

प्रभाग एक - गितांजली पाटील-843 विजयी
प्रशांत चांदे (हात) -694 विजयी
मनिषा शिंदे-641
नितीन काशीद( धनुष्यबाण) -790

प्रभाग दोन- नाजीया मुल्ला-412
मोहन शिंगाडे (हात)-450
नुरजहाँ मुल्ला-727 विजयी
विक्रम चव्हाण(कमळ)-689विजयी

प्रभाग तीन- किशोर येडगे -1049विजयी
आनंदी शिंदे(हात),-1067विजयी
मनोज येडगे-995
उमा शिंदे(कमळ)972

प्रभाग चार- भारती पाटील-662 चिठ्ठीद्वरे विजयी
राजेंद्र यादव (हात)-733 विजयी
अवंती घाडगे-662
सुहास कदम(कमळ)-595

प्रभाग पाच- मनिषा चव्हाण-740
कमल कुराडे(हात)-639-विजयी
भास्कर सोळवंडे-756 -विजयी
शोभा यादव(कमळ),468
पद्माकर जाधव, (मेणबत्ती) 16
मुकूंद माने(कपबशी,)36
सुशिल बागल( गॅस सिलेंडर)381
ज्ञानेश्वरी शिंदे(शिटी)-66

प्रभाग सहा- पूजा चव्हाण, 758 विजयी
शकुंतला शिंगण(हात) ,798विजयी
दिनेश नार्वेकर, 728
पूनम जाधव(कमळ),789

प्रभाग सात - स्वाती तुपे, 886 विजयी
दत्ता पवार(हात) 741विजयी
प्रज्ञा दरागडे, 732
हणमंत जाधव(कमळ),669
सविनय कांबळे(नारळ),94
सागर निकम (हॅट),118

प्रभाग आठ-सुनिता माळी 811,
योगेश शिंदे(हात),809
निर्मला काशिद,1020 विजयी
अजित थोरात(कमळ)974
,सुर्यकांत खोत(नारळ),43

प्रभाग 9- मनोहर शिंदे, 1883विजयी
नंदा भोसले, 1852 विजयी
अलका जगदाळे(हात), 1784 विजयी
अश्विनी हिंगसे, 873
स्वाती पवार, 927
शामराव शिंदे(कमळ) 832

Web Title: Malkapur Municipal Council, BJP's defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.