टेम्पो उलटल्याने महामार्गावर आंब्याचा सडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:38 AM2021-05-16T04:38:15+5:302021-05-16T04:38:15+5:30

चालकासह दोघे जखमी महामार्गावर आंब्यांचा सडा लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : रत्नागिरी येथून पुण्याकडे आंब्याच्या पेट्या घेऊन जात असलेल्या ...

Mango rot on the highway due to tempo reversal | टेम्पो उलटल्याने महामार्गावर आंब्याचा सडा

टेम्पो उलटल्याने महामार्गावर आंब्याचा सडा

Next

चालकासह दोघे जखमी

महामार्गावर आंब्यांचा सडा

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : रत्नागिरी येथून पुण्याकडे आंब्याच्या पेट्या घेऊन जात असलेल्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो महामार्गावरून उपमार्गावर पलटी झाला. या अपघातात चालकासह दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी सकाळी पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील गोटे गावच्या हद्दीत झाला. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहनासह आंब्याच्या पेट्या रस्त्यावर विस्कटल्यामुळे आंब्याचा सडाच पडला होता.

अपघातस्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टेंपो (एमएच ०८ एपी २७४०) मधून दोघेजण रत्नागिरी येथून पुण्याकडे आंब्याच्या पेट्या घेऊन निघाले होते. शनिवारी सकाळी सातच्यासुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत आले असता, टेंपोचालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे टेम्पो महामार्गावरून उपमार्गावर पलटी झाला. या अपघातात चालकासह दोघेजण जखमी झाले आहेत. अपघातानंतर वाहनांसह आंब्याच्या पेट्या रस्त्यावरच विस्कटल्या होत्या. आंब्याच्या पेट्या तुटल्याने परिसरात आंब्याचा सडा पडला होता. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, मानसिंग सूर्यवंशी, योगेश पवार, अमित पवार, जितेंद्र भोसले तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात माहिती देऊन मदत कार्य केले. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. महामार्ग देखभालचे व पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहन बाजूला घेऊन वाहतूक पूर्ववत केली.

फोटो

१५मलकापूर-अक्सिडेंट

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील गोटे हद्दीत शनिवारी सकाळी टेम्पोला अपघातात झाला. यामध्ये आंब्याच्या पेट्या रस्त्यावर विखुरल्या होत्या. (छाया : माणिक डोंगरे)

Web Title: Mango rot on the highway due to tempo reversal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.