सातारा जिल्ह्यात कोरोनाचे दोन बळी, प्रशासन सतर्क; मास्क सक्तीचे काढला आदेश

By दीपक देशमुख | Published: April 3, 2023 06:17 PM2023-04-03T18:17:30+5:302023-04-03T18:42:58+5:30

आतापर्यंत ४५ जणांना कोवीडची लागण झाली

Masks are again mandatory in Satara district, District Collector orders | सातारा जिल्ह्यात कोरोनाचे दोन बळी, प्रशासन सतर्क; मास्क सक्तीचे काढला आदेश

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे दोन बळी, प्रशासन सतर्क; मास्क सक्तीचे काढला आदेश

googlenewsNext

सातारा : जिल्ह्यात कोवीडमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्हा शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा-कॉलेजात मास्क अनिवार्य करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत.

जिल्ह्यात गेल्या दिवसांपासून कोवीडचे रुग्ण आढळू लागले असून सोमवारी १२ जणांची चाचणी करण्यात आली त्यापैकी ३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. आतापर्यंत ४५ जणांना कोवीडची लागण झाली आहे. दरम्यान, सोमवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.

दरम्यान, राज्यात वाढत असलेल्या सिझनल इन्फ्लुएन्झा आजार आणि कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारी व उपायोजना राबवण्याविषयी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांनी केल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश दिले आहेत. आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये यामधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी, आठवडी बाजार, एसटी स्टॅंड परिसर, यात्रा, मेळावे, लग्नसमारंभ, मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येण्याची ठिकाणे या सर्व ठिकाणी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जयवंशी यांनी केले आहे.

Web Title: Masks are again mandatory in Satara district, District Collector orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.