मासतर्फे लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:41 AM2021-04-23T04:41:26+5:302021-04-23T04:41:26+5:30
सातारा : सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, कामगार-कर्मचारी व आजूबाजूच्या परिसरातील लोकांचे कोविड-१९ लसीकरण करणेसाठी ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर, सातारा यांच्या ...
सातारा : सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, कामगार-कर्मचारी व आजूबाजूच्या परिसरातील लोकांचे कोविड-१९ लसीकरण करणेसाठी ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर, सातारा यांच्या मदतीने मासभवन येथे कोविड-१९ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास)तर्फे दोन व्हेंटिलेटर मशीन हॉस्पिटलला देणगी स्वरूपात देण्यात आली तसेच कोविड रुग्ण अंत्यविधीसाठी ४ शवदाहिनी कैलास स्मशानभूमी येथे लोकार्पण करण्यात आल्या. मासच्या सभासद उद्योजकांनीसुद्धा प्रशासनास अनेक व्हेंटिलेटर, मास्क, पीपीई किट्स, धान्य, किराणा व इतर लागणाऱ्या वस्तूंची सढळ हस्ते मदत केली आहे व अजूनही करीत आहेत.
या लसीकरण केंद्राचे औपचारिक उद्घाटन मास अध्यक्ष उदय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मास उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते, सचिव धैर्यशील भोसले, खजिनदार भरत शेठ, सहसचिव दीपक पाटील, ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर, साताराचे अध्यक्ष उदय देशमुख, डॉ. प्रताप राजे महाडिक, मास कार्यकारिणी संचालक संजय सूर्यवंशी, पृथ्वीराज पोळ, श्रीकांत तोडकर, आदित्य मुतालिक, संग्राम कोरपे, सातारा कोविड डिफेंडर ग्रुपचे ॲड. विनीत पाटील, कन्हैयालाल पुरोहित व ज्येष्ठ उद्योजक अजित बारटक्के उपस्थित होते.
मासभवन कोविड-१९ लसीकरण केंद्रास जिल्हा आरोग्य अधिकारी आठल्ये यांनी भेट दिली. त्या वेळी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास)मार्फत करण्यात आलेले नियोजन व व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त करून सदर लसीकरण केंद्रास लागेल ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मासचे सचिव धैर्यशील भोसले यांनी याची माहिती दिली.
फोटो आहे : सातारा येथील मास भवनामध्ये मासचे अध्यक्ष उदय देशमुख यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन झाले.