सातारा : निर्मल वारी, हरित वारी आणि स्वच्छ वारी संकल्पा अंतर्गत निसर्गाचा समतोल राखण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या बाजूला कडुनिंबासह इतर २० हजार झाडे लावण्यात येत आहेत, त्यामुळे नजीकच्या काळात हा मार्ग हरित होईल. तर प्लास्टिक मुक्तीसाठी पत्रावळी आणि पावसापाासून बचावासाठी वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात येत आहे.
वृक्षतोडचे प्रमाण मोठे आहे, त्यामुळे याचा परिणाम पर्यावरणावरही होऊ लागलाय. त्यातच दिवसेंदिवस पाऊसही कमी-कमी होत चाललाय. हे ओळखूनच राज्य शासनाने वृक्ष लागवडीची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेतलीय. तसेच नागरिकांमध्येही जागृती होत असल्याने वृक्षारोपणाचे प्रमाण वाढत आहे. अशाचप्रकारे प्रत्येकजण वृक्ष लागवडीसाठी योगदान देत असतानाच आता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गावर जवळपास २० हजार झाडे लावण्यात येत आहेत. त्यामध्ये कडुनिंबाच्या झाडाचा अधिक प्रमाणात समोवश आहे.
निर्मल वारी, हरित वारी आणि स्वच्छ वारी संकल्पा अंतर्गत ही झाडे लावण्यात येत आहेत. त्यासाठी शिवाजी विद्यापीठ, पुणे येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, एसएनडीटी विद्यापीठ, सोलापूरच्या अहिल्यादेवी होळकर विद्यापीठासह इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग आहे. हे विद्यार्थी पालखी तळावर थांबून लक्ष देतात. पालखी सोहळा पुढे गेल्यावर तळावर तसेच मार्गाच्या बाजूला कडुनिंबाची झाडे लावत आहेत. तसेच स्वच्छता आणि वारकºयांना सोयी सुविधा मिळतात का? हे ही ते पाहत आहेत.
जिल्ह्यात पालखी सोहळा आला असून, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी जात आहेत. बुधवारी सातारा शहरातील काही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी लोणंद येथील पालखी तळावर स्वच्छता करण्याबरोबरच वारकºयांत आरोग्य, पाण्याबाबत प्रबोधन केले. वृक्षारोपणही केले. पालखीचा शेवटचा मुक्काम बरड येथे असतो. तोपर्यंत महाविद्यालयीन विद्यार्थी वारीत सहभागी होत स्वच्छता, प्रबोधन, वृक्षारोपण असे कार्यक्रम करणार आहेत.प्लास्टिकचा वापर होणार कमी...ही वारी प्लास्टिकमुक्त होण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जवळपास ५० लाख पत्रावळींचे जेवणासाठी वाटप करण्यात येणार आहे. या पत्रावळीमुळे प्लास्टिकचा वापर खूपच कमी होणार आहे. तसेच या वारीतील ४ ते ५ लाख वारकºयांना पावसापासून बचाव होण्यासाठी ४ ते ५ लाख रेनकोटचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे वारकºयांना पावसापासून संरक्षण करता येणे शक्य होईल.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात आला आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी स्वच्छता मोहीम, प्रबोधन, वृक्षारोपण आदी कार्यक्रम करत आहेत. बुधवारीही विद्यार्थ्यांनी लोणंद येथील पालखी तळ तसेच नीरापर्यंत स्वच्छता करून वृक्षारोपण केले.- प्रा. प्रकाश गायकवाड, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा
लोणंद, ता. खंडाळा येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखीने प्रस्थान केल्यानंतर विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ केला.