छत्रपतींच्या सर्व आज्ञा हा मावळा पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 05:29 AM2019-09-16T05:29:56+5:302019-09-16T05:30:11+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने छत्रपतींच्या घराण्याचा केवळ वापर केला. त्या बदल्यात एक दशांशही त्यांना दिलेलं नाही.

The Mawla will fulfill all the commands of the Chhatrapati; Chief Minister's testimony | छत्रपतींच्या सर्व आज्ञा हा मावळा पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

छत्रपतींच्या सर्व आज्ञा हा मावळा पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Next

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसने छत्रपतींच्या घराण्याचा केवळ वापर केला. त्या बदल्यात एक दशांशही त्यांना दिलेलं नाही. छत्रपतींनी मागण्या करायच्या नसतात, त्यांनी आम्हाला आज्ञा करायची. छत्रपतींच्या सर्व आज्ञा हा मावळा पूर्ण करेल, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
भाजपच्या महाजनादेश यात्रेचे सातारा जिल्ह्यात रविवारी जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यानंतर सैनिक स्कूलच्या मैदानावर सायंकाळी जाहीर सभा झाली. फडणवीस म्हणाले, विरोधात काम करत असताना जनतेच्या प्रश्नांसाठी भाजपने सातत्याने संघर्ष यात्रा काढल्या. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार आम्ही महाजनादेश यात्रा काढून सत्तेच्या माध्यमातून पाच
वर्षांत केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा घेऊन जनतेपुढे जात आहोत. मावळ्याने कुठलीही विशेष कामगिरी केली तर त्याला पगडी देऊन छत्रपती शिवाजी महाराज सन्मानित करायचे. आताही इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. आमच्या कामगिरीवर खूश होऊन साताऱ्यातील छत्रपतींच्या वंशजांनी आम्हा मावळ्यांना पगडी व तलवार देऊन सन्मानित केले आहे. उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश करताना कुठलीही अट घातलेली नाही. त्यांचा मान-सन्मान कायम राखला जाईल.
>आमच्यावर बोलणाऱ्यांचे जनतेनेच तुकडे केले
पापं करणाºयांना सजा मिळणारच. आता इथून पुढे शिवेंद्रसिंहराजे आणि माझ्याबद्दल अपशब्द कोणी वापरला तर जिथं असतील, तिथं त्याचे तुकडे होतील, किंबहुना असे बोलणाºयांचा नाकर्तेपणाच एवढा मोठा आहे की जनताच त्यांचे तुकडे-तुकडे करेल.
- उदयनराजे भोसले
>शिकार करून जगण्याची आमची औलाद
काही दिवसांपूर्वी जी यात्रा निघाली होती, त्यात मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी मी भाजपमध्ये जात असल्याची टीका केली गेली. शिकार करून जगण्याची आमची औलाद आहे. तुकड्यावर आमचं जमत पण नाय आणि आमचं भागत पण नाय. हे टीका करणाºयांनी ध्यानात घ्यावं.
- शिवेंद्रसिंहराजे भोसले

Web Title: The Mawla will fulfill all the commands of the Chhatrapati; Chief Minister's testimony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.