सातारा : खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करत असताना प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने शिवशाही गाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल केल्या. या गाडीमुळे सुविधा होण्याऐवजी गैरसोयच जास्त होत असल्याचे अनुभवास मिळत आहे. मुंबईहून साताऱ्याला येण्यासाठीपाच तास लागतात; पण शनिवारी तब्बल पंधरा तासांचा प्रवास घडला. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.याबाबत माहिती अशी की, मुंबई सेंट्रल ते सातारा ही शिवशाही गाडी (एमएच ०४ एचवाय ५२६१) मुंबईतून ४१ प्रवाशांना घेऊन साताºयाच्या दिशेने मार्गस्थ झाली. दिवसभर मुंबईत काम करून थकल्याने सर्वजण काही वेळेतच झोपे गेले. दिवस उगवायला पहाटे पाचला साताºयात पोहोचण्याची शक्यता असल्याने अनेकांनी नातेवाइकांना फोन करून तसं सांगूनही ठेवलं.पहाटे साडेचारच्या सुमारास गाडी तळेगाव टोलनाक्याजवळ आली अन् गाडी बंद पडली. गाडीतील बिघाड लक्षात आल्यावर चालक-वाहकांनी वरिष्ठांना फोन करून लवकरात लवकर मॅकॅनिक पाठविण्याची विनंती केली. प्रवाशांना वाटले अर्धा-पाऊण तासात गाडी पुन्हा निघेल; पण एक दीड तास झाला तरी कारागीर आलाच नाही. कंटाळून काही प्रवासी खाली उतरले.जवळच्या आगारात मदतीसाठी विनवणी केल्या; पण काही उपयोग झाला नाही. त्यांनी महामंडळाच्या अन्य गाड्या थांबविण्याचा प्रयत्न केला; पण त्या भरून येत असल्याने तसेच बसण्यास जागाच नसल्याने काही करता आले नाही. खासगी कारागिराने एक तासात होईल म्हणता म्हणता चार ते पाच तासांनी गाडी सुरू केली. त्यानंतर गाडी साताºयाकडे मार्गस्थ झाली. शेवटी सायंकाळी साडेचारला गाडी साताºयात आली. संतप्त काही प्रवाशांनी याबाबत लेखी तक्रार केली आहे. याबाबत प्रशासन काय भूमीका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
मुंबई-सातारा प्रवास तब्बल पंधरा तासांनी संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 11:39 PM