वाई : तालुक्यातील पूर्व भागातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या चांदक ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची होऊन आमदार मकरंद पाटील यांना मानणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते सुनील संकपाळ, आशिष संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली विजयी झाले. चांदक ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा कायम राहिला आहे. गुरुवारी झालेल्या सरपंच, उपसरपंचपदाची निवडप्रक्रिया पार पडली.
यावेळी निवडणूक अधिकारी संतोष गेडाम, ग्रामसेवक जी. टी. केसकर यांनी सरपंचपदी सोनाली कालिदास संकपाळ, उपसरपंचपदी मोहन बाबूराव मोरे यांची बहुमताने निवड झाल्याचे घोषित केले. तर सदस्यपदी पोपट विठोबा चव्हाण, अंजना धर्माजी महामुनी, समिंद्रा देवराम खामकर यांची निवड झाली आहे. यावेळी उपस्थित विजयी उमेदवारांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
यावेळी सरपंच सोनाली संकपाळ म्हणाल्या, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कट्टीबद्ध राहीन.
यावेळी विठ्ठल खामकर, तानाजी संकपाळ, अनिल दरेकर, विश्वास भिलारे, भरत भिलारे, जीवन संकपाळ, कालिदास संकपाळ, शोभा भिलारे, शंकर संकपाळ, अक्षय संकपाळ, मनिष भिलारे, शंकर भिलारे, भगवान मोरे, मोहन जाधव, शेखर भिलारे, दत्तात्रय खामकर, शंकर कणसे, रमेश संकपाळ, शंकर कोचळे, अशोक दरेकर, मानसिंग संकपाळ, विलास संकपाळ, बाळासाहेब भिलारे उपस्थित होते.
फोटो १३चांदक ग्रामपंचायत
चांदक ग्रामपंचयातीच्या नवनिर्वाचित सरपंच सोनाली संकपाळ, उपसरपंच मोहन मोरे यांचा सत्कार करण्यात आला. (छाया : पांडुरंग भिलारे)