शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

जिल्हा परिषद रस्त्यावर गतिरोधकची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:36 AM

सातारा : येथील पोवई नाका-कोरेगाव रस्त्यावर जिल्हा परिषदेजवळ गतिरोधक तयार करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. कोरेगाव मार्गावर जिल्हा ...

सातारा : येथील पोवई नाका-कोरेगाव रस्त्यावर जिल्हा परिषदेजवळ गतिरोधक तयार करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

कोरेगाव मार्गावर जिल्हा परिषद आहे. या ठिकाणच्या चौकात चार रस्ते एकत्र येतात. कोरेगाव रस्ता चांगला करण्यात आल्याने वाहने भरधाव जातात. पोवई नाक्याकडून जाताना तर वाहनांना वेग अधिक असतो. अशा वेळी जिल्हा परिषदेत कामासाठी आलेले नागरिक रस्ता ओलांडत असतात. अशा वेळी वाहन भरधाव आल्यास अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधितांनी जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर गतिरोधक उभारावा, अशी मागणी होत आहे.

....................................................

ग्रामीण भागात कोरोनात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे चिंतेचे वातावरण बनले आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. विशेष करून ग्रामीण भागात अधिक बाधित सापडले आहेत. माण, खटाव, कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांतही रुग्ण वाढले आहेत. यामुळे प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचबरोबर, अनेक गावांचे आठवडी बाजारही बंद करण्यात आले आहेत.

..........................................................

पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठ्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहरातील पश्चिम भागात कास योजनेतून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. काहींना तर पाणी विकत घेण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.

सातारा शहराच्या पश्चिमेकडील काही भागात कास धरणातून पाणीपुरवठा होतो. बोगदा परिसर, धस कॉलनीसह काही भागात गेल्या दीड महिन्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागलाय. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत, तर अपार्टमेंटमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. परिणामी, पाणी विकत घेऊन पुरविण्याची वेळ आलेली आहे. याबाबत संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.

...................................................

वाहतुकीला व्हॉल्वचा धोका कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे काही ठिकाणचे व्हॉल्व रस्त्यावरच आहेत. त्यामुळे नागरिकांना कायम धोका आहे.

सातारा शहराला विविध योजनांतून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी शहरात जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणचे व्हॉल्व रस्त्यातच आहेत. त्यामुळे रस्त्याने चालत जाणाऱ्या नागरिकांचा त्यामध्ये पाय पडल्यास दुखापतीचीही शक्यता आहे, तसेच शहरात नवीन येणाऱ्यांना याची कल्पनाही असत नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक बनलेले आहे.

......................................................

साताऱ्यात प्लास्टीक पिशवीचा वापर सुरूच

सातारा : प्लास्टीक पिशवीवर बंदी असली, तरी सातारा शहरात अजूनही याचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. काही विक्रेते पिशवीतूनच फळे, भाजीपाला देताना दिसून येत आहेत.

सातारा शहरातील काही भाजी आणि फळ विक्रेत्यांकडून प्लास्टीक पिशवींचा वापर होत आहे. त्यामुळे प्लास्टीकबंदीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाने प्लास्टीक पिशवीवर बंदी घातली आहे. सुरुवातीच्या काळात प्लास्टीक पिशवींचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, पण त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले आहे.

.........................................................

अस्वच्छतेमुळे दुर्गंधी निर्माण

सातारा : सातारा शहरातील शेटे चौकामधील स्वच्छतागृहाशेजारी कचरा, घाण टाकण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. संबंधितांनी या ठिकाणची स्वच्छता वारंवार करावी, अशी मागणी होत आहे. या ठिकाणी परिसरातील काही नागरिक कचरा, घाण आणून टाकतात, तर भटकी कुत्री कचरा विखरून टाकत असतात. कधी-कधी हा कचरा रस्त्यावर येतो. त्यामुळे संबंधितांनी येथील स्वच्छता वारंवार करण्याची गरज आहे.

........................................................