मसूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निगडी, ता. कराड येथील श्री भैरवनाथाची यात्रा यंदा रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समिती यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
यावेळी उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, मसूर पोलीस दूरक्षेत्रचे उपनिरीक्षक प्रवीण जाधव, सरपंच सुप्रिया पाटील, उपसरपंच विनायक देटके, ग्रामसेवक आर. बी. मोमीन, तलाठी सोमनाथ तांबेवाघ, तंटामुक्त समिती अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण घोलप, पोलीसपाटील सुजाता घोलप, ग्रामपंचायत सदस्य शिवराज पाटील, विजय घोलप, सागर कुंभार, रेखा घोलप, ज्योत्स्ना घोलप, पद्मावती माने, पुनम कुंभार व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
अजय गोरड म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द करण्यात येत असल्याने कोणीही मंदिराकडे नैवेद्य घेऊन येऊ नये. घरातूनच ग्रामदेवतेचे दर्शन घ्यावे. मंदिरातील पुजारी यांनी सकाळी धार्मिक विधी पूर्ण करून मंदिर ताबडतोब बंद करावे. पालखी काढण्यात येऊ नये. गावातील ग्रामस्थांनी कोणीही पाहुणे व मित्र परिवारास यात्रेस बोलावू नये. तसे आढळून आल्यास ग्रामपंचायतीमार्फत एक हजार रुपये इतका दंड आकारण्यात येऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.