आयकर आयुक्तांची खोटी सही करून बजावल्या करदात्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:44 PM2020-02-08T12:44:41+5:302020-02-08T12:47:32+5:30
अतिरिक्त आयकर आयुक्तांच्या खोट्या सह्या करून ११ करदात्यांना नोटीस बजावणाऱ्या आयकर विभागातील कर्मचाऱ्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : अतिरिक्त आयकर आयुक्तांच्या खोट्या सह्या करून ११ करदात्यांना नोटीस बजावणाऱ्या आयकर विभागातील कर्मचाऱ्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रसाद सुहास कसबेकर (रा. कृष्णानगर, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या आयकर कर्मचाऱ्यांचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, साताऱ्यातील सायन्स कॉलेजसमोर आयकर कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये प्रसाद कसबेकर हा काम करतो.
१२ डिसेंबर २०१९ रोजी कसबेकरने ११ करदात्यांना नोटीस बजावल्या. त्या नोटीसावर अतिरिक्त आयकर आयुक्त के. के. ओझा यांच्या खोट्या सह्या केल्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आयकर निरीक्षकांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.