आता रेशनिंगवर मिळणार मका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:36 AM2021-02-14T04:36:21+5:302021-02-14T04:36:21+5:30

सातारा : जिल्ह्यातील माण आणि फलटण तालुक्यांमध्ये रेशनिंग लाभार्थ्यांना गव्हाऐवजी मका दिला जात आहे. केवळ एक रुपया किलो दराने ...

Now you will get corn on rationing | आता रेशनिंगवर मिळणार मका

आता रेशनिंगवर मिळणार मका

googlenewsNext

सातारा : जिल्ह्यातील माण आणि फलटण तालुक्यांमध्ये रेशनिंग लाभार्थ्यांना गव्हाऐवजी मका दिला जात आहे. केवळ एक रुपया किलो दराने मका दिली जात असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

रेशन दुकानामध्ये अत्यावश्यक वस्तू मिळाव्यात अशी लाभार्थ्यांची मागणी आहे. बारमाही पद्धतीने लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात हे धान्य उपलब्ध करावे, अशी मागणी आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागलेले आहे. आता लोकांना रेशनिंगच्या धान्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

सातारा जिल्ह्यामध्ये रेशनिंगवरून धान्य मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या शिधापत्रिका वाटपावर मर्यादा आलेली आहे. शासनाने जिल्ह्यासाठी दिलेला शिधापत्रिकेचा कोटा संपला असून, सव्वा लाख शिधापत्रिका वाटपाला परवानगी मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.

जिल्ह्यामध्ये १६ लाख शिधापत्रिकाधारक कुटुंबे आहेत. त्यातील ४ लाख १२ हजार १०१ शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून लाभ मिळतो. जिल्ह्याची नऊ हजार मेट्रिक टन इतकी धान्याची मागणी आहे. जिल्ह्यातील ३ लाख ८६ हजार ५00 कुटुंबे रेशनिंगच्या धान्यावर अवलंबून आहेत. यातील बहुतांश वर्ग हा कष्टकरी आहे.

जिल्ह्यात रेशनिंग कार्डधारक : ७ लाख १९ हजार १३४

अंत्योदय योजना : २८ हजार ५00

केशरी कार्डधारक (प्राधान्य कुटुंब यादीतील) : ३ लाख ८६ हजार ५०० ग्राहक

केशरी कार्डधारक (धान्य मिळत नसलेले) : २ लाख ४६ हजार ७७५

कोट...

रेशनिंगवर पूर्वी गहू मिळत होता. पण काही दिवसांपूर्वी तो मिळत नव्हता. दहिवडी, फलटण या भागात गव्हाला पर्याय म्हणून मका मिळू लागला. गरिबाच्या दृष्टीने जेवढे धान्य रेशनिंगवर मिळेल तिवढे चांगलेच आहे. आता मकादेखील मिळणार असल्याने मोठा आधार मिळेल. शासनाने स्वच्छ धान्य द्यावे, एवढी इच्छा आहे.

- संभाजी कदम, लाभार्थी

कोट...

रेशनिंगवर अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य काही वेळेला येते. केंद्र शासनाकडून चांगले धान्य मिळत असले तरी मधली साखळी त्यात खडे, माती मिसळत असते काय? कारण धान्यात मोठ्या प्रमाणात माती असते. शासनाने स्वच्छ धान्य देण्यावर भर देणे आवश्यक आहे. बाजारातील ज्वारीचा दर वाढला असल्याने गरिबांना आता रेशनिंगवरची ज्वारीही द्यावी.

- सूर्यकांत परामणे, लाभार्थी

चौकट..

एक किलोला एक रुपया

मक्याचा बाजारातील भाव जास्त आहे. ज्वारी खरेदी करून भाकरी करणे गरीब कुटुंबांना अवघड झाले आहे. या परिस्थितीत सरकारने अल्प दरात मका उपलब्ध केली असल्याने लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोट..

दहिवडी व फलटणमध्ये गव्हाऐवजी रेशनिंग लाभार्थ्यांना मका दिला जात आहे. एक किलोला केवळ १ रुपये दराने मका दिला जातो. जिल्हा प्रशासनाने रेशनिंगचा फायदा गरजवंतांना मिळावा, यासाठी विशेष उपाययोजना केलेली आहे. सध्या शासनाकडून तूरडाळ मिळत नसून उपलब्ध झाल्यानंतर तूरडाळीचे वाटप सुरू होईल. धान्यापासून कार्डधारक वंचित राहू नये, याची काळजी घेतली जात आहे.

- स्नेहा किसवे-देवकाते, जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Now you will get corn on rationing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.