सातारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले असून बुधवारी नवीन १९७ बाधितांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांचा आकडा ६० हजार १६६ वर पोहोचला. तर कोरोनाने एका महिलेचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या १ हजार ८६५ झाली आहे.जिल्हा प्रशासनाने बुधवारी जाहीर केल्यानुसार १९७ नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. यामध्ये सातारा शहरबारोबरच तालुक्यातील पोगरवाडी, कोडोली, पिलाणीवाडी, क्षेत्र माहुली, महागाव, जिहे, खोडद येथे नवीन रुग्ण सापडले. तसेच कºहाड शहराबरोबरच तालुक्यातील मसूर, कोपर्डे, इंदोली येथे तर पाटण तालुक्यात पाटण, मल्हारपेठ, दिवशी, चोपदारवाडी गावांत नवीन रुग्णांची नोंद झाली.फलटण शहराबरोबरच तालुक्यातील खुंटे, पिंप्रद, तरडगाव, मुंजवडी, कोळकी, शिंदेवाडी, सांगवी, जिंती, बरड, गिरवी, ठाकुरकी या गावांत रुग्ण आढळले. खटाव तालुक्यातील मायणी, निमसोड, पुसेगाव, वडूज, नेर तर माण तालुक्यातील वरकुटे, गोंदवले बुद्रुक, नरवणे आणि मलवडी गावांत रुग्णांची नोंद झाली.
कोरेगाव शहराबरोबरच तालुक्यातील रहिमतपूर, देऊर, जळगाव येथे तसेच खंडाळा तालुक्यात खंडाळा, शिरवळ, लोणंद, पळशी, कवठे, सांगवी, पाडेगाव, आसवली व पारगावला रुग्ण आढळून आले. वाई,जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यातही नवीन रुग्ण स्पष्ट झाले आहेत.दरम्यान, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात माण तालुक्यातील सत्रेवाडी येथील ७५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे.