प्रगती जाधव-पाटील।सातारा/सांगली : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दिवसभरात लाखो वाहनांची वर्दळ असते. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि तासवडे, किणी टोलनाक्यावरून जाणाऱ्या गाड्यांचा आकडा शासनाच्या संकेतस्थळावर दर महिन्याचा उपलब्ध आहे. मात्र, खेडशिवापूर आणि आनेवाडी टोलनाक्यावरील आकडेवारी दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या (न्हाई) अखत्यारित येणारा खेडशिवापूर ते आनेवाडी टोलनाका असुविधांच्या गर्तेत आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दिवसाला लाखो गाड्या प्रवास करतात. मात्र, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून पुढं खेडशिवापूरकडे येणाºया गाड्यांच्या संख्येत प्रचंड तफावत दिसते. याविषयी माहिती हा फरक आनेवाडी टोलनाक्यावरही दिसतो. पुढं तासवडे आणि किणी या दोन्ही टोलनाक्यांकडे जाताना वाहनांची संख्या वाढल्याचे दिसते.
एका खासगी सर्वेक्षण करणा-या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ४३ लाख वाहने टोलनाक्यावरून प्रत्यक्षात जातात, पण कागदावर केवळ १७ लाख वाहने गेल्याची नोंद असते. याविषयी अधिकृत माहिती देण्यास शासकीय यंत्रणा असमर्थ असल्याचं सांगिंतलं जातं.
आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाका परिसरातील ५ किलोमीटर अंतराच्या परिघातील गावे टोलमुक्त करण्यात आली आहेत. अनेकदा या अंतराच्या पलीकडे असणाºया वाहनांनाही टोल न घेता सोडलं जातं. काहीवेळा पावतीशिवाय टोल घेतला जातो; मोठी रांग असताना पैसे गोळा करून अनेक पद्धतीने घोळ घातले जातात. अनेकवेळा वाहनधारकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांना टोलवरील कर्मचाऱ्यांकडून दमदाटी करण्याचा प्रयत्न होतो. प्रसंगी मारहाणही होते. टोल भरूनही होणारा हा त्रास चालकांना असह्य होतो.
क-हाड परिसर बनतोय अपघातप्रवण क्षेत्रतुटलेल्या जाळ्या : महामार्गावर क-हाडच्या नवीन कोयना पुलापासून नांदलापूरपर्यंत महामार्ग आणि उपमार्गात संरक्षक जाळ्या आहेत. मात्र, या जाळ्या ठिकठिकाणी तुटल्या आहेत. त्यामुळे अनेकजण त्यातून महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करतात आणि जीव गमावतात.
छेदरस्ताच नाही : तासवडे टोलनाका ते वाठारपर्यंत ठराविक ठिकाणीच छेदरस्ता आहे. या छेदरस्त्यानजीक आवश्यक त्या उपाययोजना नाहीत. त्यामुळे छेदरस्त्यातून महामार्ग ओलांडताना वाहनांना अपघाताचा सामना करावा लागतो.येथे होतात अपघात... : कºहाड परिसराचा विचार करता, कोल्हापूर नाका, नांदलापूर बसथांबा, गोटे बसथांबा, गंधर्व हॉटेलसमोरील थांबा व जाखीणवाडी ही ठिकाणे अपघातास निमंत्रण देणारी आहेत. संबंधित ठिकाणी बसथांबे आहेत. मात्र, तेथे कसलीच सुरक्षा नाही.
ट्रॅफिक सर्व्हे करून ठरते ‘पे बॅक’ची रक्कम!एखाद्या ठिकाणी टोलनाका उभा करायचा असेल, तर त्या रस्त्यावरून एका दिवसात सरासरी किती वाहने प्रवास करतात, याचा अंदाज घेतला जातो, त्याला ट्रॅफिक सर्व्हे असं म्हणतात. हा सर्व्हे केल्यानंतर किती टोल आकारायचा आणि किती वर्षांसाठी टोलनाका सुरू ठेवायचा हे निश्चित करण्यात येतं, याला ‘पे बॅक’ सिस्टीम असं म्हणतात. आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्यावर झालेला ट्रॅफिक सर्व्हे रिपोर्ट आणि ‘पे बॅक’ अहवाल नेमका काय सांगतो, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
क-हाडच्या कोल्हापूर नाक्यावर धोका कायमकºहाडचा कोल्हापूर नाका हा अपघातप्रवण क्षेत्र. याठिकाणी दिवसाला दोन-तीन लहान-मोठे अपघात होतातच. आवश्यक त्या उपाययोजना नसल्यामुळे आणि धोकादायक स्थितीमुळे नाक्यावर ही परिस्थिती आहे.
- कोल्हापूर नाक्यावर उड्डाण पूल उभारण्यासाठी दहा वर्षांपूर्वी भूगर्भातील थर परीक्षण केले गेले. मात्र, नंतर कोणतीच कार्यवाही झाली नाही. अनेकवेळा एमएसआरडी व विविध विभागाकडून पाहणी करून नकाशे तयार केले. ते नकाशे केवळ कागदोपत्रीच राहिले.
महामार्गावरील रस्त्यांबाबत ‘न्हाई’ची भूमिका कायमच असंवेदनशील राहिली आहे. याप्रश्नी कधीही लोक एकत्र येऊन उठाव करत नाहीत, याचा अंदाज त्यांनी घेतलाय. त्यामुळे जोपर्यंत त्यांना आर्थिक फटका बसत नाही, तोवर ते सुविधा उपलब्ध करून देणार नाहीत, हे सत्य आहे.- विवेक वेलणकर,माहिती अधिकार कार्यकर्ता, पुणे