किराणा दुकान सुरू ठेवल्याने व्यापाऱ्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:04 AM2021-05-05T05:04:16+5:302021-05-05T05:04:16+5:30
पुसेगाव : पुसेगावात लॉकडॉऊन काळात किराणा दुकान सुरू ठेवल्याने खटावच्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक हजार रुपये ...
पुसेगाव : पुसेगावात लॉकडॉऊन काळात किराणा दुकान सुरू ठेवल्याने खटावच्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. एक हजार रुपये दंड करून सोमवार, दि. १० पर्यंत दुकान सील करण्यात आले आहे.
जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी कडक लॉकडाऊनचा आदेश दिला असताना पुसेगाव येथील राजू शहा यांनी किराणा दुकानातून विक्री सुरू ठेवली होती. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून दुकान सील केले आहे.
ग्रामदक्षता समितीचे सहसचिव तलाठी गणेश बोबडे, पुसेगावचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे-पाटील यांनी ही कारवाई केली.
खटाव येथील किराणा व्यापारी राजू शहा याचे पुसेगाव येथे दहिवडी रस्त्यालगत दुकान आहे. शहा मागील बाजूच्या दरवाजातून किराणा सामानाची विक्री करत होता. वारंवार समज देऊनही गेल्यावर्षीच्या कोरोना काळातही या दुकानदाराचा असाच प्रताप सुरू होता. आता मात्र तलाठी बोबडे व पोलीस उपनिरीक्षक लोंढे-पाटील यांना माहिती मिळताच दुकानावर जाऊन धडक कारवाई केली. कायद्यानुसार एक हजार रुपये दंड व सील ठोकले आहे. कारवाईवेळी दुकानात असलेल्या ग्राहकांना पथकाने चांगलेच फटकारले.
दरम्यान, येथील छत्रपती शिवाजी चौकात सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले व कर्मचाऱ्यांनी विनाकारण मोकाट चालत व दुचाकीवर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली. तसेच बारा दुचाकी जप्त करून पोलीस ठाण्यात लावल्या आहेत. पुसेगावात येणाऱ्या सर्व बाजूच्या रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेट्स लावून येणाऱ्या-जाणाऱ्यांना विचारणा केली जात आहे. योग्य कारण असेल, तरच परवानगी दिली जात आहे. त्यामुळे मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना चाप बसला आहे.
फोटो ०४पुसेगाव-दुकान सील
पुसेगाव येथील राजू शहा यांच्या किराणा दुकानावर कारवाई करून तलाठी गणेश बोबडे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे-पाटील यांनी दुकान सील केले. (छाया : केशव जाधव)