पसरणी : वाई तालुक्यातील धोम-बलकवडी ही धरणे दरवर्षी आॅगस्टअखेर पूर्ण क्षमतेने भरलेली असतात; मात्र यंदा पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या धोम व वाई तालुक्यातच पावसाने पूर्णत: उघडीप दिल्याने पावसाचा हंगाम कोरडा गेला. जूनच्या सुरुवातीला झालेल्या थोड्या पावसाने पाणी पातळीत थोडीशी भर पडली होती. मात्र, तेही पाणी आसरे बोगदा व कॅनॉलद्वारे सोडण्यात आले आणि त्यामुळे जेवढी पाण्याची पातळी वाढली होती, ती सुद्धा खालावली आहे.प्रमुख धोम धरणात केवळ ४० टक्के पाणीसाठा पाणीसाठा आहे. विशेषत: दोन्ही धरणांच्या दरवाजाला पाणीही लागले नाही. ज्या ठिकाणी पाण्याची पातळी आहे, ती दरवर्षी एप्रिल ते मे महिन्यांमध्ये असते. मात्र यंदा आॅक्टोबरमध्येच मे महिन्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला तसेच पिण्याचा पाणी व उपचार सिंचन योजनांना याचा फटका बसत आहे. विशेषत: हा सर्व भाग हा धरणग्रस्त आहे आणि आपल्या कहक्काचे पाणी आतामात्र आपल्याला प्राधान्याने मिळावे, अशी भावना नागरिकांतून होत आहे.धरणाची पाणीपातळी हा आॅक्टोबर महिन्यातच चिंतेचा विषय बनला आहे. अजून आगामी मान्सून येण्यासाठी आठ- नऊ महिने वाट पाहावी लागणार आहे. सध्या सुरू असणारा पावसाने धरण पातळीत किंचितही वाढ झाली नाही. विशेषत: धरण परिसरात हा पाऊस समाधानकारक असा पडला नसून धरण पातळी ‘जैसे थे’ आहे.धरण व्यवस्थापणापुढे पाणी व्यवस्थापणा बाबत अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. (वार्ताहर)पावसाने यंदा दाखवलेली अवकृपा व त्यामुळे धरणाच्या पातळीत वाढच झाली नाही आणि मग जर ४० टक्के पाणीसाठा शिल्लक असताना पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. -दत्तात्रय सुर्वे, शेतकरी धोम धरण हा १३.५० टीएमसीचा असून, धरण क्षेत्रात आजअखेर ४९५ मिमी पावसाची नोंद आहे. धरणाची पाणीपातळी ७३७ मीटर असून, सध्याचा पाणीसाठी १७६.५८ द.ल. घ.मी. म्हणजे ६.२३ टीएमसी व त्यातील उपयुक्त पाणीसाठी १२५.३१ द.ल. घ.मी. म्हणजे ४.४२ टीएमसी आहे. धरण आजअखेर ४० टक्के भरले आहे. एकूण १३.५० टीएमसीपैकी धरणातील ११.६९ टीएमसी हा एवढाच साठा उपयुक्त आहे. मात्र यंदा आजअखेर ४.४२ टीएमसी एवढाच साठा उपयुक्त म्हणून शिल्लक आहे.-सी. एस. सणस, शाखा अभियंता
धोम धरणात केवळ चाळीस टक्केच पाणी
By admin | Published: October 04, 2015 9:20 PM