आमची पळण्याची हौस फिटली: उदयनराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 11:30 PM2019-01-27T23:30:10+5:302019-01-27T23:30:16+5:30

सातारा : जेव्हा दोन्ही राजे एकमेकांना भेटले होते. तेव्हा उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंच्या खांद्यावर हात ठेवला होता. तेव्हा शिवेंद्रसिंहराजेंनी याबाबत विचारल्यावर ...

Our excitement was fussy: Udayanraje | आमची पळण्याची हौस फिटली: उदयनराजे

आमची पळण्याची हौस फिटली: उदयनराजे

Next

सातारा : जेव्हा दोन्ही राजे एकमेकांना भेटले होते. तेव्हा उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंच्या खांद्यावर हात ठेवला होता. तेव्हा शिवेंद्रसिंहराजेंनी याबाबत विचारल्यावर ‘फिटनेस चेक करतोय असे उत्तर उदयनराजेंनी दिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा रविवारी यवतेश्वर घाटात हे दोघे आमने-सामने आले. यावेळी खासदार उदयनराजे यांनी ‘तुम्ही एवढं पळवले की दोघांची पळण्याची आता हाऊसच फिटली,’ अशी मार्मिक टिप्पणी केली.
दरम्यान, दोन्ही राजेंनी हातात हात घालून ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ची खूण दाखवून आम्ही दोघं पुन्हा एकत्र येऊ शकतो, असेच सूचित केले. यानिमित्ताने खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील विरोध निवडणुकीच्या तोंडावर मावळत चालला असून, गेल्या दोन दिवसांत तीन कार्यक्रमांच्या निमित्ताने दोघे एकत्र आल्याचे दिसले. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कार्यक्रमासाठी आल्यानंतर एका गाडीतूनच पवार, उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे आणि आमदार शशिकांत शिंदे आले. यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनीच त्या गाडीचे सारथ्य केले.
खासदार उदयनराजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांत दुरावा निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत होते. अनेक आमदारांनी त्यांच्याविरोधात शरद पवार यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर तर खासदार उदयनराजे भोसले मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंत्र्यांचीही भेट घेताना दिसले. त्यामुळे उदयनराजेंच्या मनात नक्की काय चालले आहे तेच कळत नव्हते. त्यातच खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे काही कार्यक्रमाच्या ठिकाणी समोरासमोर आले. त्यावेळी उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंचा खांदा दाबल्याची घटना घडली. यामुळे दोघांचे सूर जुळत असल्याचे समोर आले होते.
सातारकरांसाठी हे शुभसंकेतच होते. असे असतानाच शनिवारी एका खासगी कार्यक्रमासाठी शरद पवार साताऱ्यात आले होते. त्यांनी खासदार उदयनराजे, आमदार शिवेद्रसिंहराजे आणि आमदार शशिकांत शिंदे यांना एकाच गाडीमध्ये घेतले. विशेष म्हणजे यावेळी चक्क शिवेंद्रसिंहराजे यांनी गाडीचे सारथ्य केल्याचे सातारकरांनी पाहिले.
यवतेश्वर घाटात आमने-सामने.
शरद पवार यांच्याबरोबर शनिवारी सकाळी खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे होते. त्यानंतर सायंकाळी साताºयात एका ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम होता. त्यावेळी दोघे राजे एकत्र दिसून आले. त्याचबरोबर रविवारी तर शहराजवळील यवतेश्वर घाटात दोघे एकत्र आले. रनिंग स्पर्धेचे निमित्त त्यासाठी कारणीभूत ठरले. त्यावेळी दोघांनीही व्ही फॉर व्हिक्टरीची खून करून दाखविली. हे मनोमिलनाकडे जाण्याचेच संकेत ठरत आहेत.

Web Title: Our excitement was fussy: Udayanraje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.