पोलीस व न्याय यंत्रणेवर आमचा विश्वास : घोडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:30 AM2021-06-01T04:30:04+5:302021-06-01T04:30:04+5:30

सातारा : ‘आमच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी आम्ही पोलीस यंत्रणेला सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत. ज्या ज्येष्ठ नागरिकांवर गुन्हा दाखल ...

Our faith in the police and the judiciary: Horses | पोलीस व न्याय यंत्रणेवर आमचा विश्वास : घोडके

पोलीस व न्याय यंत्रणेवर आमचा विश्वास : घोडके

Next

सातारा : ‘आमच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी आम्ही पोलीस यंत्रणेला सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत. ज्या ज्येष्ठ नागरिकांवर गुन्हा दाखल झाला त्यांचीही बाजू आम्ही सक्षमपणे लढू. दाखल झालेला गुन्हा हे एक षडयंत्र असून, पोलीस व न्याय यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे,’ अशी स्पष्टोक्ती सातारा विकास आघाडीच्या नगरसेविका स्मिता घोडके यांनी दिली आहे.

कस्तुरबा रुग्णालयात झालेल्या वादावादीच्या घटनेनंतर नगरसेविका स्मिता घोडके व त्यांचे पती चंद्रशेखर घोडके यांच्यासह सहा जणांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकाराबाबत घोडके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दादागिरी अथवा अरेरावी करणे आमच्या स्वभावात नाही. दोन दिवस षडयंत्र रचून आमच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांची पोलीस प्रशासन व न्याय यंत्रणा नक्कीच चौकशी करेल. वास्तविक कस्तुरबा रुग्णालय हे आमच्या प्रभागात येते. आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळे याठिकाणी लसीकरणाची व्यवस्था सुरू झाली. मी दि.२७ मे रोजी दमबाजी केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दि. २९ मे रोजी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या दिवशी दमबाजी केली, त्याच दिवशी गुन्हा का नोंद केला नाही. या प्रश्नातच गुन्हा खरा आहे की, रचला आहे हे स्पष्ट होते, असेही घोडके यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Web Title: Our faith in the police and the judiciary: Horses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.