बहिष्काराबाबत पवारांसमोर ठाम जिल्ह्यातील आमदार आक्रमक : स्पष्ट म्हणाले, ‘आम्ही येणार नाही.. तुम्ही जावे !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 01:42 AM2018-02-25T01:42:54+5:302018-02-25T01:42:54+5:30

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या सत्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस अन् राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साताºयात आले असले तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी मात्र या सोहळ्यास न जाण्याचा निर्णय घेऊन

 On the outskirts of Pawar, MLA from Tham district attacked, said: 'We will not come .. You should go!' | बहिष्काराबाबत पवारांसमोर ठाम जिल्ह्यातील आमदार आक्रमक : स्पष्ट म्हणाले, ‘आम्ही येणार नाही.. तुम्ही जावे !’

बहिष्काराबाबत पवारांसमोर ठाम जिल्ह्यातील आमदार आक्रमक : स्पष्ट म्हणाले, ‘आम्ही येणार नाही.. तुम्ही जावे !’

googlenewsNext

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या सत्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस अन् राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साताºयात आले असले तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी मात्र या सोहळ्यास न जाण्याचा निर्णय घेऊन साताºयाच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे.

विशेष म्हणजे शरद पवार जेव्हा आपल्या पक्षाच्या आमदारांशी चर्चा करण्यात गुंतलेले होते. याचवेळी दुसरीकडे उदयनराजे हे भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील अन् शिवसेनेचे पालकमंत्री विजय बापू शिवतारे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी हेलीपॅडवर थांबले होते.

बारामतीतून निघालेले शरद पवार साताºयात आल्यानंतर माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या प्रीती हॉटेलमध्ये दाखल झाले. पावणे तीन वाजता राष्ट्रवादीच्या मोजक्या मंडळींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील यांच्यासह पक्षातील इतर स्थानिक नेते उपस्थित होते. शरद पवार उदयनराजेंच्या सोहळ्यास उपस्थित राहणार का, अशी चर्चा दिवसभर राहिल्याने या बैठकीकडे बाहेरील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते.

दरम्यान, ही बैठक सुरू असतानाच उदयनराजे अकस्मातपणे याठिकाणी आले. पवार यांचे स्वागत करून ते पुन्हा निघून गेले. त्यानंतर इतर आमदारांची पवारांशी पुन्हा चर्चा सुरू झाली. यानंतर उदयनराजे मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत करण्यासाठी हेलीपॅडवर प्रतीक्षा करू लागले. यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील अन् साताºयाचे पालकमंत्री विजय बापू शिवतारे हे होते. मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांचे स्वागत करून उदयनराजे पुन्हा पवारांच्या बैठकीत आले.

राजेंशी चर्चा झाल्यानंतर शरद पवारही बैठकीतून उठले. त्यानंतर त्यांची गाडी कार्यक्रमस्थळाकडे रवाना झाल्यामुळे पवारांच्या अनुपस्थितीची चर्चा संपली. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी खासदार शरद पवार यांच्याशी कमराबंद चर्चा केली. तिसºया मजल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी त्यांची चर्चा सुरू असताना दुपारी सव्वातीन वाजता खासदार उदयनराजे यांची एंट्री झाली. शरद पवार यांचे स्वागत करून त्यांच्याशी मोजका संवाद साधून उदयनराजे निघून गेले. त्यानंतर आमदारांशी त्यांनी चर्चा सुरू केली.

कमराबंद चर्चेत व्यक्त झाली नाराजी...जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी खासदार शरद पवार यांच्याशी कमराबंद चर्चा केली. साताºयातील एका हॉटेलच्या तिसºया मजल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी त्यांची चर्चा सुरू असताना दुपारी सव्वातीन वाजता खासदार उदयनराजे यांची एंट्री झाली. शरद पवार यांचे स्वागत करून त्यांच्याशी मोजका संवाद साधून उदयनराजे निघून गेले. त्यानंतर विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व राष्ट्रवादीचे इतर आमदार मंडळी दाखल झाले. कमराबंद चर्चेत उदयनराजेंबाबत नाराजी व्यक्त केल्याचे संकेत नंतर मिळालेच. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील विरोध, विधान परिषदेच्या निवडणुकीतही पक्षाविरोधात घेतलेली भूमिका याबाबत आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याचे सर्वांच्याच देहबोलीतून स्पष्ट झाले.

उदयनराजे दोन वेळा पवारांना भेटीला
खासदार शरद पवार हॉटेलवर राष्ट्रवादीच्या आमदार व नेते मंडळींशी चर्चा करत असताना दुपारी सव्वातीन वाजता तिथे आले. पाच मिनिटे थांबले. ‘मुख्यमंत्री आल्यानंतर कळवा, आम्ही लगेच निघू,’ असे पवारांनी सांगितल्यानंतर उदयनराजे निघून गेले. मुख्यमंत्री आल्यावर पुन्हा सायंकाळी पाच वाजता उदयनराजे हॉटेलवर आले. पाच मिनिटांत बाहेरही पडले. त्यांच्या मागून शरद पवारही निघून गेले. त्यानंतरही राष्ट्रवादीचे आमदार मंडळी त्याच ठिकाणी बसून राहिले होते. त्यानंतर त्यांच्यात खलबते रंगली होती. सोहळ्याकडे जाणार का? असे पत्रकारांनी विचारल्यानंतर बहुतेकांनी लग्नाची निमंत्रणे असल्याचे सांगितले.

Web Title:  On the outskirts of Pawar, MLA from Tham district attacked, said: 'We will not come .. You should go!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.