पाचवड-मुंबई रातराणी बससेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:33 AM2021-01-09T04:33:00+5:302021-01-09T04:33:00+5:30
याबाबत माहिती अशी की, आटपाडी आगाराची आटपाडी-काळाचौकी ही गाडी मार्चपर्यंत या मार्गावर सुरू होती. मात्र मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव ...
याबाबत माहिती अशी की, आटपाडी आगाराची आटपाडी-काळाचौकी ही गाडी मार्चपर्यंत या मार्गावर सुरू होती. मात्र मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ही बससेवा बंद झाली होती. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सायंकाळी पाचनंतर मायणी-चितळीपासून पुसेसावळी जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते. त्यामुळे नोकरीनिमित्त व्यापारानिमित्त बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत होते.
वडूज आगाराने ही रातराणी सुरू केल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. पाचवड मुंबई सेंट्रल बस पाचवडमधून सायंकाळी साडेसहा वाजता सुटणार आहे. पाचवड, कलेढोण, मायणी, चितळी, म्हासुर्णे, चोराडे, जयराम स्वामी
वडगाव, पुसेसावळी, नागझरी, आर्वी, किरोली, सुर्ली, रहिमतपूर, सातारा, कात्रज बायपास, दुतग्रती मार्गाने, मुंबई सेंट्रल जाणार आहे.
रोज रात्री अकरा वाजता मुंबई सेंट्रल येथून ही बस पुन्हा याच मार्गाने दुतग्रतीमार्गे कात्रज बायपास, सातारा, रहिमतपूर, आर्वी, नागझिरा, पुसेसावळी, वडगाव, चोराडे, मासुर्णे, चितळी, मायणी, कलेढोणमार्गे पाचवडला येणार आहे.