Lok Sabha Election 2019 सातारा जिल्ह्यातील जनता दहा वर्षांपासून दहशतीखाली: नरेंद्र पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 11:09 PM2019-04-14T23:09:05+5:302019-04-14T23:09:26+5:30

पाल : ‘जिल्हा गेल्या दहा वर्षांपासून दहशतीखाली आहे. यामुळे येथे विकास झाला नसतानाही जनता अन्याय सहन करत आहे. यापुढे ...

 People of Satara district have been under the scanner for ten years: Narendra Patil | Lok Sabha Election 2019 सातारा जिल्ह्यातील जनता दहा वर्षांपासून दहशतीखाली: नरेंद्र पाटील

Lok Sabha Election 2019 सातारा जिल्ह्यातील जनता दहा वर्षांपासून दहशतीखाली: नरेंद्र पाटील

Next

पाल : ‘जिल्हा गेल्या दहा वर्षांपासून दहशतीखाली आहे. यामुळे येथे विकास झाला नसतानाही जनता अन्याय सहन करत आहे. यापुढे येथील जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी माझी राहील,’ असे आवाहन
सातारा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केले.
पाल येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कºहाड उत्तर भाजपा नेते मनोज घोरपडे, माजी सभापती हिंदुराव चव्हाण, कºहाड उत्तरचे कार्याध्यक्ष महेश जाधव, बाजार समितीचे संचालक रामकृष्ण वेताळ उपस्थित होते.
नरेंद्र पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यामध्ये विकासकामे व्हायला पाहिजे होती तेवढी झाली नाही. याला कारणीभूत फक्त विद्यमान खासदार आहेत. कोल्हापूरला मंत्री चंद्रकांत पाटील टोलमुक्त करत असतील तर साताऱ्याच्या खासदारांनी सातारकरांसाठी टोलमुक्त का नाही केले? जिल्ह्यामध्ये मोठी धरणे असूनही जिल्ह्यातील दुष्काळ त्यांना का हटविता आला नाही. जिल्ह्यात तरुणांची संख्या मोठी आहे. नव्या पिढीला कॉलर उलटी करण्याचा आदर्श देण्यापेक्षा चांगला आर्दश द्या.’
चरेगावकर म्हणाले, ‘जिल्ह्यातील बंद पडलेल्या योजना विधानसभेच्या पूर्वीच सुरू केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.’
पावसकर म्हणाले, ‘जिल्ह्यामध्ये अनेक विकासकामे रखडली आहेत. अद्याप ती पूर्ण झाली नाहीत व ती करण्याचाही प्रयत्न कुणी केला नाही. त्यामुळे आता परिवर्तनाची गरज आहे.’
नरेंद्र पाटील यांनी श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर पाली या गावामध्ये नरेंद्र पाटील यांची रॅली काढण्यात आली. रामकृष्ण वेताळ, मनोज घोरपडे, विश्वासराव काळभोर, कºहाड उत्तरचे भाजपाध्यक्ष सूर्यकांत पडवळ, माजी सरपंच सयाजी पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पंचायत समितीचे सदस्य संजय घोरपडे, अ‍ॅड. विशाल शेजवळ, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विक्रम गायकवाड, तालुकाध्यक्ष सूर्यकांत पडवळ, सुनील पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, विश्वासराव काळभोर, संतोष पाटील, सयाजीराव पाटील-कोर्टी उपस्थित होते.

Web Title:  People of Satara district have been under the scanner for ten years: Narendra Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.