डोली निळेश्वर येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:08+5:302021-06-09T04:48:08+5:30
कोपर्डे हवेली : वडोली निळेश्वर ता. कऱ्हाड येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या ...
कोपर्डे हवेली : वडोली निळेश्वर ता. कऱ्हाड येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, मंडलाधिकारी विनायक पाटील, संगीता साळुंखे, मुख्याध्यापक सचिन नलवडे, सरपंच भीमराव मदने, उपसरपंच सविता पवार, ग्रामविकास अधिकारी संजय नलवडे, तलाठी संजय सावंत, माजी सरपंच सुरेखा डुबल, नीलेश पवार, सोमनाथ पवार, अविनाश डुबल, दादासाहेब वाघमारे, प्रदीप पवार, संतोष पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी मंत्री पाटील म्हणाले, की सध्याच्या परिस्थितीत पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्याची जोपासना केली पाहिजे. त्यासाठी शेताच्या कडेला जी झाडे शेतीपूरक आहेत आणि त्यातून फायदा मिळेल, अशी झाडे लावून दुहेरी फायदा घेतला पाहिजे.
यावेळी चिंच, आंबा, वड, पिंपळ चिक्कू,आदींसह इतर झाडांचे रोपन करण्यात आले.
चौकट..
वडोली निळेश्वर गावाला तिन्ही बाजूंनी डोंगर असल्याने येथे वृक्षारोपण करण्यात येत असते. लावलेल्या झाडांचे संगोपन करून ती जगवली जातात. त्यामुळे गावाच्या आणि शिवाराच्या सौंदर्यात भर पडली आहे.