अगोदर सत्तर हजार कोटींचा हिशेब द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:36 PM2017-11-26T23:36:26+5:302017-11-26T23:37:09+5:30

Please give an account of seventy thousand crores in advance | अगोदर सत्तर हजार कोटींचा हिशेब द्या

अगोदर सत्तर हजार कोटींचा हिशेब द्या

googlenewsNext


कºहाड : ‘मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे. शरद पवारांचा विद्यार्थी नव्हे. खरं बोलणं रक्तातला गुण आहे. सत्तेत असून, सत्तेच्या विरोधात बोलतो. यावर शरद पवार टीका करतात. पक्षातल्याच माणसांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही मुख्यमंत्री झालात, हे जनता विसरलेली नाही. आधी ७० हजार कोटींचा हिशेब द्यावा,’ असे आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला दिले. कºहाड येथील भाजी मंडईतील जनता व्यासपीठावर रविवारी शिवसेनेचा शेतकरी संवाद मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार दगडू सकपाळ, आमदार शंभूराज देसाई, गजानन कीर्तीकर, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘गेले दोन दिवस मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये इथल्या कार्यकर्त्यांचे प्रेम आणि उत्साह पाहत आहे आणि त्याबरोबरच इथल्या जनतेचा सरकारविरोधातील आक्रोश अनुभवत आहे. यशवंतराव चव्हाण यांची शनिवारीच पुण्यतिथी झाली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा चालवीत असल्याचे सांगितले. मात्र, ते नेमकं कसलं राजकारण करताहेत, हे अवघ्या महाराष्ट्राने ओळखले आहे. महाराष्ट्रातील राजकारण नासत चाललं आहे. होय, आमचा सरकारला पाठिंबा आहे; पण याचा अर्थ असा नाही की चुकीचं चालल्यावर बोलू नये. आणि खरं बोलणं हा तर आमचा गुण आहे. हे धाडस मी करत असताना खरंतर एखाद्याने माझे कौतुक करायला पाहिजे; पण उलट माझ्यावर टीका होते, याचं मला विशेष वाटतं.
वीज कनेक्शन मागितलं तरी मिळत नाही. वीज बिले वाढवून येताहेत. शेतकºयांच्या कर्जमाफीचा बट्ट्याबोळ झालाय आणि या सगळ्या परिस्थितीत तीन वर्षांनंतर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. या सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं या योजनेला नाव दिलं. मला खूप आनंद झाला; पण ज्यादिवशी शेतकºयांचा सात-बारा कोरा होईल, त्यादिवशी खºया अर्थाने मला आनंद होईल. शेतकरी म्हणजे कोणी मल्ल्या नाही. तो बळिराजा आहे. तुम्हा-आम्हा सगळ्यांचा तो पोशिंदा आहे. अहो, तो मल्ल्या कोट्यवधींची फसवणूक करून तिकडं मजा मारतोय आणि दुसरीकडं आमचा शेतकरी मुलीचं लग्न कसं करायचं, या विवंचनेत आत्महत्या करतोय. याचा विचार सरकार करणार आहे की नाही, हा माझा सवाल आहे.
...मग त्याचीही जाहिरात करा!
तुम्हाला कर्जमाफीचा किती फायदा झाला? तुम्हाला जीएसटीचा किती फायदा झाला? तुम्हाला नोटाबंदीचा किती फायदा झाला? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी जनसमुदायाला विचारले. समोरून ‘नाही’ असे उत्तर आले. त्यावेळी ठाकरे म्हणाले, ‘रविशंकर नावाचे ज्येष्ठ नेते तर नोटाबंदीमुळे वेश्या व्यवसायाला चाप लागला,’ असं सांगतात. त्यांना हे कसे कळाले माहीत नाही. आणि खरंच जर याला चाप लागला असेल तर त्याचीही जाहिरात करा,’ असा टोला त्यांनी भाजप सरकारला लगावला.
भाजप, राष्ट्रवादीला हल्लाबोलचा अधिकार नाही
कºहाडात शनिवारी राष्ट्रवादीचा हल्लाबोल झाला; पण अजित पवारांनी सोलापूरच्या शेतकºयाला दिलेले उत्तर अजूनही शेतकरी विसरलेला नाही, तर शेतकºयाच्या छातीवर नाही तर पायावर गोळ्या घालायला पाहिजे होत्या, असे विधान करणारे भाजप नेते या दोघांनाही हल्लाबोल करण्याचा नैतिक अधिकार नाही. तो अधिकार फक्त आणि फक्त शेतकºयाला आहे. तरीही तुम्हाला हल्लाबोल आंदोलन करायचे असेल तर आधी ७० हजार कोटींचा हिशेब द्या आणि मग खुशाल हल्लाबोल करा,’ असा टोला ठाकरे यांनी राष्ट्रवादीला लगावला.

Web Title: Please give an account of seventy thousand crores in advance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.